Friday, 23 March 2018

प्रदूषणाच्या समस्येला टक्केवारीचे ‘छत्र’

चिखली - भंगार व्यावसायिक आणि नदी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांकडून राजकारणी व अधिकाऱ्यांना मिळणारी टक्केवारी हप्त्यांमुळेच कुदळवाडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भंगार व्यवसाय फोफावत आहे. त्यामुळेच वायू व इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे.

[Video] आता पार्किंगसाठी पिंपरी चिंचवडकरांना पैसे मोजावे लागणार

पुण्याप्रमाणेच पिंपरीतही पार्किंग धोरण लवकरच राबविले जाणार आहे.. त्यामुळे आता पार्किंगसाठी पिंपरी चिंचवडकरांना पैसे मोजावे लागणार आहे.. महापौर नितीन काळजे यांनी या धोरणाला हिरवा कंदिल दिला असून महापालिका प्रशासनाने त्यानुसार पार्किंगचे धोरण बनविण्याचे काम हाती घेतलयं.. लवकरच महासभेसमोर हे धोरण सादर होणार असून शहरातील वाहतूककोंडीसह पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा केला जात आहे...

शिवसेना, भाजप आमदारांचे चाकणपर्यंत मेट्रो विस्तारावर एकमत

पिंपरी : केंद्र व राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सभागृह तसेच सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडतात. त्यातच यापुढील निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केल्याने ही युती तुटली आहे. मात्र, पुणे मेट्रो विस्ताराच्या मुद्यावर मात्र या दोन्ही पक्षांच्या आमदारांचे एकमत झाले आहे, हे विशेष.

पिंपरी चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावा; महेश लांडगे यांनी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष्य

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. औद्योगिकरणात वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, विद्यार्थींनी यांची सुरिक्षतता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या दुरावस्थकडे लक्ष्य वेधत त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

Corporation set to collect property, water tax through apps, smart cards

PIMPRI CHINCHWAD: In an effort to promote e-governance, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will collect property and water tax via mobile applications, e-wallets, smart cards, and other such facilities. As many as 100 municipal offices, across all eight civic zones, will be equipped for the online services.

फेरीवाल्यांच्या जागांसाठी आज सोडत

पिंपरी - राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहेत. त्याची शुक्रवारी (ता.२३) चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांनी दिली.

सायकल शेअरिंगचे पुणे मॉडेल पिंपरीतही?

पिंपरी - पुणे शहरात काही ठिकाणी सायकल शेअरिंगचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायकल शेअरिंगचे हे पुणे मॉडेल पिंपरी-चिंचवड शहरातही राबवावे, अशी मागणी गुरुवारी (ता. २२) ‘सीईई’ (सेंटर फॉर एन्व्हॉयर्न्मेंट एज्युकेशन) या संस्थेने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. त्यानुसार बीआरटी विभागास याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्‍तांनी केली.