Wednesday 8 August 2012

घरकुल लाभार्थ्यांचे मुद्रांक शुल्क माफ होणार !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32217&To=7
घरकुल लाभार्थ्यांचे मुद्रांक शुल्क माफ होणार !
पिंपरी, 7 ऑगस्ट
स्वस्तात घरकुल प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना महापालिका आयुक्तांनी खूषखबर दिली आहे. घरकुल लाभार्थ्यांकडून आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याची तरतूद कायद्यात असल्याची बाब अभ्यासू आयुक्तांनी शोधून काढली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे 36 ते 40 हजार रुपये वाचणार आहेत.

पुरुषोत्तम' साठी पिंपरी-चिंचवडमधील कॉलेज सज्ज !

'पुरुषोत्तम' साठी पिंपरी-चिंचवडमधील कॉलेज सज्ज !
पिंपरी, 7 ऑगस्ट
यावर्षीचा पुरुषोत्तम करंडकची प्राथमिक फेरी 16 ऑगस्टपासून असल्याने प्रत्येक कॉलेजमध्ये जोरदार तयारी सुरु आहे सोमवार ते शनिवार सायंकाळी पाच वाजता आणि रविवारी सकाळी नऊ व सायंकाळी पाच वाजता एकांकिका होणार आहेत. आपलं सादरीकरण उत्तम व्हावे यासाठी सगळेजण कसून तयारी करत आहेत. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडच्या कॉलेज मधील वातावरणही पुरुषोत्तममय होऊ लागले आहे. या उत्साही वातावरणाचा घेतलेला एक आढावा.....

सर्वसामान्यांचे प्रस्ताव 'लालफिती'त मात्र पदोन्नती, पदनिर्मितीची प्रकरणे शासनाकडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32193&To=5
सर्वसामान्यांचे प्रस्ताव 'लालफिती'त मात्र पदोन्नती, पदनिर्मितीची प्रकरणे शासनाकडे
पिंपरी, 6 ऑगस्ट
सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक प्रस्ताव 'लालफिती'त गुंडाळून ठेवत अधिका-यांच्या पदोन्नती, पदनिर्मितीचे प्रकरणे शासन दरबारी धाडण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने तत्परता दाखविली आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये प्रस्ताव जळाल्याच्या भीतीने महापालिकेने पुन्हा पाठविलेल्या प्रस्तावांमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाकडे पाठविलेल्या 61 पैकी तब्बल 46 प्रस्ताव प्रशासन विभागाकडील आहेत. मात्र वर्गवारीसह दंड आकारुन नियमित करता येणारी बांधकामे, घरकुलाच्या वाढीव खर्चाचा भार शासनाने उचलणे यांसारख्या असंख्य प्रस्तावाचा महापालिकेला विसर पडला आहे.

Civic bodies owe Rs 111 cr to PMPML

Civic bodies owe Rs 111 cr to PMPML: The Pune Mahanagar Parivhan Mahamandal Limited (PMPML) has initiated steps to recover dues worth Rs 111 crore from Pune and Pimpri Chinchwad municipal corporations.

Civic body to pay fine to Maharashtra pollution control board

Civic body to pay fine to Maharashtra pollution control board: The health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation will pay fine for not renewing the biomedical waste licence of Yashwantrao Chavan Memorial(YCM) hospital for four years

Autorickshaw union threatens strike over poor CNG supply

Autorickshaw union threatens strike over poor CNG supply: Autorickshaw drivers said they have to wait for three to four hours everyday to fill CNG in their vehicles at the gas filling stations in Pune and Pimpri-Chincwhad.

मोशीतील खून प्रकरण; आरोपी फरारच

मोशीतील खून प्रकरण; आरोपी फरारच: पिंपरी । दि. ५ (प्रतिनिधी)

मोशीतील वीट कारखान्यावरील मुकादम बंकीम गिरी (३५) यांच्या खूनप्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात यश येत नसल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे. आरोपींची पूर्ण नावे मिळू न शकल्याने तपासात अडथळे येत आहेत. कारखाना मालकाकडेही कामगारांच्या माहितीचा तपशील उपलब्ध नसल्याने तपासातील अडचणी वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी गुलाब रुसलेलाच!

‘फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी गुलाब रुसलेलाच!: पिंपरी । दि. ५ (प्रतिनिधी)

पिंपरी भाजी मंडईत मोठी आवक झाल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १0 रुपये असलेली मेथी, शेपू, पालक, कोथिंबीरचे दर निम्म्याने घटले. फळांचे दर कायम असून भारतीय सफरचंदाची आवक वाढली आहे. फ्रेण्डशिपच्या दिवशी मागणी नसल्याने गुलाबांची फुले रुसल्याचे चित्र दिसून आले.
पाऊस सर्वत्र चांगला स्थिरावल्याने भाजीपाल्याचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. चंदननगर, मंचर, खेड, पुणे, चाकण, शेल पिंपळगाव आदी भागातून भाजीपाल्याची मोठी आवक झाली. त्यामुळे मंडईत आज मोठय़ा प्रमाणात सर्वच गाळ्यांवर हिरवीगार भाजी दिसत होती.

मैत्रीचे नाते झाले अधिक घट्ट

मैत्रीचे नाते झाले अधिक घट्ट: पिंपरी । दि. ५ (प्रतिनिधी)
मैत्री म्हटलं ना खूप बरं वाटतं इतर नात्यांपेक्षा जास्त खरं वाटतं

रक्ताची नाती मनाप्रमाणे निवडता येत नाहीत. पण मैत्रीचं विश्‍व तर आपण निर्माण करू शकतो ना! मैत्रीची श्रीमंती वाढवितानाच ती चिरंतन ठेवण्याच्या आणाभाका आज अनेकांनी घेतल्या. त्याला निमित्त ठरला तो फ्रेण्डशिप डे. एकमेकांना शुभेच्छा देत मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यात आले. मैत्रीतील ओलावा निरंतर जपण्याची आंतरिक तळमळ व्यक्त करीत रविवारी शहरात फ्रेण्डशिप डे साजरा झाला.

PCMC seeks 4 FSI to regularise unauthorised constructions

PCMC seeks 4 FSI to regularise unauthorised constructions: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided to send a proposal to the state government, asking for four FSI (floor space index) so that unauthorized constructions in the twin township can be regularized.

PCMC told to step up security

PCMC told to step up security: Pimpri-Chinchwad corporators on Friday urged the civic administration to step up security in the twin township in the wake of the serial blasts in Pune on Wednesday. The issue was raised during the general body meeting, which was later adjourned to condemn the blasts. Opposition leader Kailas Kadam sought to know the security measures the civic administration had taken and also the efficiency of its disaster management plan.

नगरसेविका फुगे यांच्यावर गुन्हा

नगरसेविका फुगे यांच्यावर गुन्हा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी जातीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांच्यावर अखेर भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

कायदा सल्लागार नियुक्त

कायदा सल्लागार नियुक्त: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा सल्लागाराच्या नियुक्तीसाठी त्यांनी सादर केलेल्या अटी मान्य करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मंजुर केला आहे. हे महत्त्वाचे पद जास्त काळ रिक्त राहू नये, यादृष्टीने निर्णय घेतल्याचा दावा समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी केला आहे.

जकात समानीकरणामुळे पिंपरी पालिकेला १०० कोटींचा फटका?

जकात समानीकरणामुळे पिंपरी ...:
अत्यावश्यक वस्तूंचे दर ‘जैसे थे’; प्लास्टिक पिशव्यांवर आठ टक्के जकात
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जकात नियमावलीतील विविध १८ प्रकारच्या मालांवर समान जकातदर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी, २.६० टक्के असलेली जकात यापुढे चार टक्के  आकारण्यात येणार आहे.
Read more...

पिंपरीकरांच्या मनात स्फोटाइतकीच भीती बांधकामे पाडण्याची

पुण्यातील साखळी स्फोटाचे पिंपरी ...:
पिंपरीकरांच्या मनात स्फोटाइतकीच भीती बांधकामे पाडण्याची
पिंपरी / प्रतिनिधी
पुण्यातील साखळी स्फोटाच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी पिंपरी पालिकेच्या सभेत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. जर्मन बेकरीत स्फोट झाल्यानंतर सदस्यांनी केलेल्या सुरक्षाविषयक सूचनांची अंमलबजावणी न झाल्याचे उघड करत प्रशासनाच्या ‘पुढचे पाठ-मागचे सपाट’ प्रवृत्तीवर ताशेरेही ओढले.
Read more...

चाकण,राजगुरुनगर होणार नगरपालिका

चाकण,राजगुरुनगर होणार नगरपालिका: चाकण। दि. ३ (वार्ताहर)
मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या सचिवांनी ३0 जुलै १२ रोजी चाकण व राजगुरुनगर येथील नवीन नगरपालिका प्रस्तावास मंजुरी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या दोन्ही शहरांना नगरपालिकांचे स्वरूप प्राप्त होण्याची स्पष्ट होऊ लागले आहे.

Pune-Talegaon local extended up to Lonavala

Pune-Talegaon local extended up to Lonavala: The railway administration has decided to extend the Pune-Talegaon local that departs from Pune railway station at 7.20 pm till Lonavala following public demand.

Open DP claims one more life in Chinchwad

Open DP claims one more life in Chinchwad: PIMPRI: An exposed Distribution Point (DP) of the Maharashtra State Electricity Distribution Company at Chinchwad station claimed another life on Friday evening.

H1N1 claims woman’s life

H1N1 claims woman’s life: PIMPRI: The H1N1 virus has claimed the life of a 40-year-old woman from Yamuna Nagar at Nigdi on Friday.

Defence authorities close Pimple Saudagar Road again

Defence authorities close Pimple Saudagar Road again: PIMPRI: The defence authorities have, since Thursday evening, closed the Kate Vasti - Rakshak Chowk Road in Pimple Saudagar for vehicular traffic or people's movement.
Defence authorities close Pimple Saudagar Road again

Rs30 cr to be spent on CCTVs in Pune, Pimpri-Chinchwad: Ajit Pawar

Rs30 cr to be spent on CCTVs in Pune, Pimpri-Chinchwad: Ajit Pawar: Pawar, who is the Guardian Minister of Pune, met top cops to take stock of the security situation after the serial blasts last Wednesday.

PCMC puts off demolition drive

PCMC puts off demolition drive: Cops busy with security; PCMC to file FIRs. With the Pune police busy in investigations and security arrangement duties after the series of blasts in the city on Wednesday, the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) anti-encroachment demolition drive seems to have taken a back seat for the time being.

MPCB slaps Rs12,000 fine on PCMC

MPCB slaps Rs12,000 fine on PCMC: PCMC had started its CBWTF at Yashwantrao Chavan Memorial Hospital in Sant Tukaramnagar area of Pimpri in 2006.

Twin township to get 160 CCTV cameras

Twin township to get 160 CCTV cameras: After Jungli Maharaj Road serial explosions, police dept requests civic body to install them.

जन्मलेल्या प्रत्येक बाळाला लसीकरणाची आवश्यकता - डॉ. परदेशी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32178&To=9
जन्मलेल्या प्रत्येक बाळाला लसीकरणाची आवश्यकता - डॉ. परदेशी
पिंपरी, 6 ऑगस्ट
बांधकाम क्षेत्रात 'गगनभरारी' घेणा-या व्यावसायिकांनी इमारतींचे उंच इमले उभारणा-या कामगारांबरोबरच त्यांच्या मुलांचे आरोग्य जपले पाहिजे. जन्म घेतलेल्या प्रत्येक बाळाला वाढत्या वयाप्रमाणे लसीकरण केले पाहिजे, त्यामुळे बाळ निरोगी व सुदृढ राहील. त्यासाठी कामगारांनी लसीकरणाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी (ता. 6) केले आहे.

बिकट वाट वहिवाट नसावी......!

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32180&To=6
बिकट वाट वहिवाट नसावी......!
पिंपरी, 6 ऑगस्ट
अद्याप म्हणावा तसा मुसळधार पाऊस सुरू झाला नाही तोवरच पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. त्यामुळे खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना मोटोक्रॉसचा अनुभव मिळत असल्याचे चित्र सध्या चिखली, कुदळवाडी परिसरात पाहायला मिळत आहे.

'मॉडेल शो' च्या झगमगत्या वातावरणात 'बटवा'चे उद्‌घाटन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32173&To=5
'मॉडेल शो' च्या झगमगत्या वातावरणात 'बटवा'चे उद्‌घाटन
पिंपरी, 5 ऑगस्ट
एखाद्या शोरुमचे उद्‌घाटन म्हणजे मान्यवरांनी फीत कापणे, भाषण करणे असे नेहमीचे प्रकार असतात. परंतु या नेहमीच्या प्रकाराबरोबरच संगीताच्या ठेक्यावर मॉडेलची पडणारी पाऊले.... रंगबिरंगी प्रकाशझोत अशा वेगळ्या उत्साही वातावरणात बटवा या नामांकित ब्रँडच्या पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या शोरुमचा प्रारंभ करण्यात आला. सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते या शोरुमचे उद्‌घाटन करण्यात आले.

गणपतीबाप्पा यंदा इकोफ्रेंडली होणार !

गणपतीबाप्पा यंदा इकोफ्रेंडली होणार !
पिंपरी, 5 ऑगस्ट
बाप्पाच्या आगमनाला आता फक्त दीड महिना राहिल्यामुळे मूर्तीकारांची लगबग उडाली आहे. यंदाच्या गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात विरघळणा-या प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरून या मूर्ती करण्यात येत आहेत. या मूर्तींनी पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता नाही असा दावा या मूर्तीकारांकडून केला जात आहे.
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32154&To=6

'फ्रेंडशिप डे' ठरला तीन मित्रांच्या जीवनाचा अखेरचा दिवस !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32164&To=9
'फ्रेंडशिप डे' ठरला तीन मित्रांच्या जीवनाचा अखेरचा दिवस !
तळेगाव दाभाडे, 5 ऑगस्ट
पंपावरून डिझेल भरून बाहेर पडणा-या ट्रेलरवर कार आदळून झालेल्या अपघातात कारमधील तीन मित्र जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे लडकत पेट्रोलपंपासमोर घडला. मृतांमध्ये तळेगावच्या माजी नगराध्यक्षा विजया भांडवलकर यांच्या मुलाचा समावेश आहे. या दुर्दैवी अपघातामुळे तीन मित्रांच्या जीवनातील आजचा 'फ्रेंडशिप डे' अखेरचा ठरला.

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अव्वल क्रमांकाशिवाय पर्याय नाही !-अनिल सिन्हा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32148&To=5
स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अव्वल क्रमांकाशिवाय पर्याय नाही !-अनिल सिन्हा
पिंपरी, 4 ऑगस्ट
शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे सर्वोच्च गुणांनी यश मिळविणा-या विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रात प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यामुळे आता फक्त उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण व्हावे लागेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या गुणानी पास होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन टाटा मोटर्स पुणे (सीव्हीबीयू) प्रकल्प प्रमुख अनिल सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना केले.

मावळ गोळीबारातील मृतांच्या वारसांची वणवण सुरुच !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32141&To=6
मावळ गोळीबारातील मृतांच्या वारसांची वणवण सुरुच !
पिंपरी, 4 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनाला येत्या 9 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत असतानाच मावळवासियांमध्ये या घटनेच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. त्यातच शासन आणि महापालिकेकडून नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने जखम अधिकच चिघळल्याची व्यथा या आंदोलनातील मृतांच्या वारसांनी शनिवारी (दि. 4) महापालिका प्रशासनापुढे मांडली.