Tuesday 28 August 2012

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्य

वायसीएममधील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सहकार्यपिंपरी - 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठामार्फत सर्वतोपरी सहकार्य करू,'' असे आश्‍वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिले. 

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडे

दापोडीमध्ये लोहमार्गाला तडेपिंपरी - मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दापोडी स्थानकादरम्यान लोहमार्गाला तडा गेला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पाऊण तास ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजता ती सुरळीत झाली. 

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे

मुंबईहून दुचाकीवर यायचे नि सोनसाखळी चोरून पळायचे: पिंपरी -&nbsp मुंबईहून दुचाकीवर पिंपरी-चिंचवड शहरात यायचे आणि सोनसाखळी हिसकवायची, असा प्रकार इराणी चोरट्यांकडून सुरू असल्याचे सांगवी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप'

लांडे यांचे वक्तव्य ही "लोणकढी थाप': पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात कधीही बैठक झाली नसून ती विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यासोबत झाली होती.

...तर महापौरांवर कारवाई करा

...तर महापौरांवर कारवाई करा: पिंपरी -&nbsp 'अनधिकृत बांधकामांचे समर्थन केल्यामुळे नगरसेवकांवर कारवाई होणार असेल, तर पीठासन अधिकारी म्हणून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापौर मोहिनी लांडे यांच्यावर प्रथम कारवाई करा,'' अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मोफत झाडे: ‘राज्यात शंभर कोटी झाडे लावायचे ‘टार्गेट’ लवकर पूर्ण करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी वनविभाग मोफत झाडे देणार आहे, ’ अशी घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली.

जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32751&To=10
जकातचोरीबद्दल पिंपरी वाघेरे येथील मिळकतीला सील !
पिंपरी, 27 ऑगस्ट
महापालिकेला विक्रीकर विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पिंपरी वाघेरे येथील जमतानी आयर्न अँड ट्रेडींग यांनी 2007-09 या दोन वर्षाच्या कालावधीत 10 लाख 15 रुपयांची जकात चुकविल्याचे उघड झाले आहे. त्यावर जकात शुल्क आणि दहापट तडजोड शुल्क अशी 69 लाख 59 हजार 375 रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस बजावूनही त्याला दाद न दिल्याने महापालिकेने जमतानी यांच्या मालमत्तेला सील ठोकले असल्याची माहिती जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी दिली.

होमिओपॅथीकडे अखेरचा पर्याय म्हणून पाहू नका- डॉ. शैलेश देशपांडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32749&To=9
होमिओपॅथीकडे अखेरचा पर्याय म्हणून पाहू नका- डॉ. शैलेश देशपांडे
पिंपरी, 27 ऑगस्ट
ब-याचदा रुग्ण कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही की नाईलाजाने होमिओपॅथी उपचाराकडे वळतात. त्यानंतर बहुतांश रुग्ण या उपचाराअंती बरेही होतात. परंतु या रुग्णांनी आधीपासूनच होमिओपॅथीवर विश्वास ठेवला तर त्यांना होणारा त्रास व इतर उपचारांवर होणारा खर्च वाचू शकतो असे मत सर्च होमिओपॅथीक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. शैलेश देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच 'सर्च'मध्ये होणा-या होमिओपॅथीमधील संशोधनाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी उदाहरणासहित दिली.

गणेश मूर्तींवर कलाकुसर सुरू

गणेश मूर्तींवर कलाकुसर सुरू: पिंपरी । दि. २५ (प्रतिनिधी)

विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव अवघ्या २१ दिवसांवर आला असून मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. तर भक्तांपर्यंत मूर्ती पोहचिण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग महागल्याने तसेच वाहतूकखर्चात वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती २0 टक्क्यांनी महागणार आहेत. त्यामुळे लाडक्या गणरायासाठी भक्तांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शाडू मातीचा पुरवठा यंदा कमी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

असा होतो व्यवसाय..

पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्ती निर्मितीचे काम कमी प्रमाणावर होते. मात्र, तयार मूर्ती आणून स्टॉल लावून विक्री करण्यावर काही लोक भर देतात. सहा महिनेअगोदरच मूर्तीची नोंदणी कारखान्यात केली जाते. हजार ते पाच हजार असा अँडव्हान्स दिला जातो. कारखान्यात उपलब्ध असणार्‍या विविध आकारांतील नमुना मूर्तीच्या आधारे कारखाना मालक नोंदणी करून घेतात. त्यानंतर दोन आठवडे अगोदर या मूर्ती विक्रीच्या ठिकाणी आणल्या जातात. तात्पुरत्या भाड्याच्या जागेत त्यांची ग्राहकांसाठी मांडणी केली जाते. या व्यवसायातून ३0 ते ४0 टक्के नफा मिळविता येतो. होलसेल दरात मिळालेल्या मूर्ती, ते स्टॉलपर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च, स्टॉलचे भाडे असा खर्च करावा लागतो. अत्यंत कमी दिवसांत आणि कमी परिश्रमात हंगामी व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्याकडे विक्रेत्यांचा कल अधिक आहे.

कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण?

कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण?: पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सध्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या पथकातील कर्मचा-यांना विम्याचे संरक्षण देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation launches disaster management portal

Pimpri-Chinchwad Municipal Corporation launches disaster management portal: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has opened a disaster management cell to tackle floods, fires, accidents, cyber attacks and other such incidents.

Medical college to be set up at Yashwantrao Chavan Memorial Hospital

Medical college to be set up at Yashwantrao Chavan Memorial Hospital: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Maharashtra University of Health Sciences will set up a post graduate medical institute at the civic-run Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) in Pimpri.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to upgrade smaller civic hospitals

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to upgrade smaller civic hospitals: Municipal commissioner Shrikar Pardeshi said the population of Pimpri-Chinchwad city at present is around 18 lakh, which is expected to increase to about 35 lakh by 2030.

Pimpri Chinchwad New Township Development Authority gets 200 responses on 2.5 FSI plan

Pimpri Chinchwad New Township Development Authority gets 200 responses on 2.5 FSI plan: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has received around 200 suggestions and objections from citizens on its proposal to allow 2.5 Floor Space Index (FSI) to housing projects for poor people.

Hotels and restaurants in Pimpri Chinchwad city to increase rates of food items

Hotels and restaurants in Pimpri Chinchwad city to increase rates of food items: Hotels and restaurants owners in Pimpri Chinchwad city will be increasing the rates of food items by around 20 % from September 1 onwards.

Proposal for developing vegetable market in Kasarwadi

Proposal for developing vegetable market in Kasarwadi: A proposal for developing a vegetable market near the railway crossing in Kasarwadi will come up for approval at the meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC)'s general body(GB) on September 1.

Pimpri Chinchwad College of Engineering organises industry institute interaction meet

Pimpri Chinchwad College of Engineering organises industry institute interaction meet: The Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE) Pune is organising the "PCCOE Industry Institute Interaction Meet - 2012" here on August 30. The event is being organised in association with University of Pune (Board of Student Welfare).

Medical Vision 2030: PCMC, MUHS pact to set up post-graduate institute

Medical Vision 2030: PCMC, MUHS pact to set up post-graduate institute: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the Maharashtra University of Health Sciences, Nashik, have decided to join hands to start a post-graduate institute for running courses in MS/MD.

Pawar to hold high-level meeting

Pawar to hold high-level meeting: Deputy chief minister Ajit Pawar will soon hold a high-level meeting to resolve issues regarding demarcation of floodline, unauthorised constructions, housing project for economically weaker section and Bus Rapid Transit System (BRTS) in Pimpri-Chinchwad.

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will speed up the land acquisition process for the Pune International Exhibition Centre at Moshi.

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre

Land acquisition to be speeded up for Pune International Exhibition Centre: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will speed up the land acquisition process for the Pune International Exhibition Centre at Moshi.

यंदाच्या 'पुरुषोत्तम' मधून तरुणाईच्या प्रश्नांचे प्रतिबिंब

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32730&To=9
यंदाच्या 'पुरुषोत्तम' मधून तरुणाईच्या प्रश्नांचे प्रतिबिंब
पिंपरी, 26 ऑगस्ट
पुरुषोत्तम करंडकाचे दहा दिवस सरले. या दहा दिवसात 'पुरुषोत्तम'ने अनेकविध विषयांच्या सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाच्या डोहात बुडवून आनंदीत केले आहे. दररोज नवनवीन विषयांच्या आधारे सामाजिक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणा-या एकांकिका सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव दिला आहे. यावेऴी पिंपरी-चिंचवडमधीलही कॉलेजच्या एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकांच्या विषयांचा घेतलेला हा आढावा.

उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32728&To=10
उल्हासनगरमधील बेकायदेशीर बांधकामे नियमित होतात तर उद्योगनगरीतील का नाही ? - तावडे
पिंपरी, 26 ऑगस्ट
सामान्य नागरिकांनी घामाच्या पैशातून उभारलेले 'स्वप्नातील घर' राष्ट्रवादी काँग्रेसने जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यापेक्षा उल्हासनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी पिंपरी येथे केली. राष्ट्रवादीच्या राज्यात मोगलाई बोकाळली असून, प्रशासनाला हाताशी धरून नागरिकांचा 'निवारा' हिरावून नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. इथले एकही घर पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

'सदनिकाधारकांनो 'व्हॅट' भरू नका' - तावडे यांचे आवाहन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32725&To=7
'सदनिकाधारकांनो 'व्हॅट' भरू नका' - तावडे यांचे आवाहन
पिंपरी, 26 ऑगस्ट
राज्य शासनाच्या बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे सदनिकाधारक कराच्या ओझ्याखाली दबला जात आहे. त्यामुळे या सदनिकाधारकांनी 'व्हॅट' कर न भरण्याचे आवाहन भाजपा नेते विनोद तावडे यांनी आज केले.

पिंपरीत शानदार मिरवणुकीने 'चालिहो'ची सांगता

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32716&To=7
पिंपरीत शानदार मिरवणुकीने 'चालिहो'ची सांगता
पिंपरी, 25 ऑगस्ट
सिंधी बांधवांच्या चालिहो या उत्सवाची आज पिंपरी-चिंचवडमध्ये एका दिमाखदार शोभायात्रेने सांगता झाली. या शोभायात्रेचा शेवट सिंधी बांधवांनी 40 दिवस तेवत ठेवलेल्या दीपज्योती अर्थातच बहराणो नदीत सोडून करण्यात आला. या शेकडो दीपज्योतींनी पवना नदीचे पात्र उजळून निघाले.

टांगती तलवार -संपादकीय

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32710&To=5
टांगती तलवार -संपादकीय
अनधिकृत बांधकामांविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या धडक मोहिमेने शहरातील अनेकांची झोप उडवली आहे. ही मोहीम थांबावी आणि आपली घरे वाचावीत यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची या मंडळींची तयारी आहे. तवा तापलेला असताना राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेतेमंडळीही नेहमीप्रमाणे पुढे सरसावली आहेत. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बाब पुढे आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेबाबत आम्ही 'माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम'च्या माध्यमातून जनमत आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यात आमच्या तब्बल 88 टक्के दर्शकांनी कारवाईचे समर्थन केले आहे तर केवळ 11 टक्के दर्शकांचा या कारवाईला विरोध केला आहे तर एक टक्के दर्शकांनी या विषयावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

शहराच्या आरोग्यासाठी व्हिजन 2030 - आयुक्त

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32704&To=9
शहराच्या आरोग्यासाठी व्हिजन 2030 - आयुक्त
पिंपरी, 25 ऑगस्ट
जेएनएनयुआरएमच्या माध्यमातून रस्ते मलशुध्दीकरण केंद्र, बीआऱटीएस प्रकल्पासाछी भरीव निधी मिळाला. मात्र आरोग्य विभागासाठी अशी विशेष योजना नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (शनिवारी) व्यक्त केली. शहराच्या आरोग्यासाठी 'व्हिजन 2030'च्या आराखड्याची आखणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एमआयडीसी'च्या पंपिंग स्टेशनमध्ये पंपचालकाची आत्महत्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32702&To=7
एमआयडीसी'च्या पंपिंग स्टेशनमध्ये पंपचालकाची आत्महत्या
पिंपरी, 25 ऑगस्ट
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पंपिंग स्टेशनमध्ये एका पंपचालकाने बिजलीनगर येथील 'एमआयडीसी' पंपिंग स्टेशनच्या आवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पंपचालकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.