Tuesday 18 September 2012

'सिटी सेंटर'साठी महापालिका लावणार 350 कोटींची बोली

'सिटी सेंटर'साठी महापालिका लावणार 350 कोटींची बोली
पिंपरी, 17 सप्टेंबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर महापालिकेने सिटी सेंटरसाठी अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या वेळी सिटी सेंटरसाठी विकसकाकडून किमान 350 कोटी रुपयांची बोली अपेक्षित धरण्यात आली आहे. मागील चुका दुरुस्त करुन लवकरच याबाबतचा फेरप्रस्ताव तयार केला जाणार आहे. महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत नियोजित सिटी सेंटर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



शिक्षण मंडळाला न्यायालयाची चपराक

शिक्षण मंडळाला न्यायालयाची चपराकपिंपरी - सर्वांत कमी दराची निविदा असलेल्या ठेकेदाराला काम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांना बूट-मोजे पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंडळाचे माजी प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. 

इयत्ता पहिली ते सातवी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना मोफत बूट-मोजे पुरविण्यासाठी मंडळाने निविदा मागविल्या होत्या. ठाण्यातील समर्थ स्टोअर्स या पुरवठादाराची निविदा कमी दराची होती. मात्र, त्यांना अपात्र ठरवून नव्याने निविदा काढण्याचा घाट घालण्यात आला होता. समर्थच्या संचालकांनी त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. या दाव्यात महापालिका आयुक्त, शिक्षण मंडळ, तत्कालीन सभापती नवनाथ जगताप आणि प्रशासन अधिकारी म्हणून ओव्हाळ यांना प्रतिवादी केले होते. 

महिला सबलीकरणाचा घुमणार नारा

महिला सबलीकरणाचा घुमणार नारा: पिंपरी - "सकाळ' मधुरांगण व लायन्स क्‍लब ऑफ पुणे दुर्गाटेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.

PMPML to run extra buses

PMPML to run extra buses: PMPML will run additional buses from 21 locations at night hours during the 10-day Ganesh festival. The additional bus service will be provided from September 23 to 29, depending on the passenger rush. For buses operating after 10pm, the PMPML will charge 25% additional fare. PMPML officials said monthly and daily pass holders will be able to use their passes for the special buses only till midnight. Since some roads are closed during the festival, the buses will take alternative routes, the officials said.

'PCMC misled court on illegal structure'

'PCMC misled court on illegal structure': Mohite, in her letter, stated she had filed a petition in the high court in 2008 seeking the removal of the unauthorized constructions built on a plot, which was reserved for a primary school, in Phugewadi.

राजगुरूनगरमध्ये भाताच्या लावणीला वेग

राजगुरूनगरमध्ये भाताच्या लावणीला वेग: खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसा बरोबरच भाताचे देखील आगर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी पावसाळ्यात घेतले जाणारे भात हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. या शेतक-यांच्या रोजच्या आहारात देखील भाताचे प्रमाण जास्त असते किंबहुना भात हेच त्यांचे प्रमुख अन्न आहे.

क्रीडानगरीतील सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा

क्रीडानगरीतील सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा: ‘लंडन ऑलिंपिकमध्ये मिळालेल्या यशात पुण्याचा निम्मा वाटा आहे. मात्र, दुर्दैवाने येथील सुविधांचा पुरेपूर वापर होत नसून, येथे जवळजवळ पंधरा हजार मुलं खेळताना दिसायला हवी. नुसती स्टेडियम उभारल्यानंतर काम संपत नाही, उलट ख-या अर्थाने कामाला सुरुवात होते.

भूसंपादनापूर्वीच ठेका

भूसंपादनापूर्वीच ठेका: - प्राधिकरण, महापालिका, एमआयडीसीत समन्वयाचा अभाव
विश्‍वास मोरे। दि. १६ (पिंपरी)

जमिनीचे भूसंपादन नाही, महापालिका व प्राधिकरण यांची सीमा निश्‍चित नाही, एमएसईबी, एमआयडीसी यांच्यातील गुंता अद्यापही सुटला नसताना रस्त्याचा ठेका काढून प्राधिकरण मोकळे झाले आहे. भूसंपादनापूर्वीच प्राधिकरण ठेकेदारावर मेहेरबान असल्याचे दिसून येते. प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या चार वर्षांपासून चिंचवडगाव ते रावेत रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे.

जुना जकातनाका चिंचवड ते रावेत असा चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता नवनगर विकास प्राधिकरण, महापालिका यांच्या सीमेवरून जातो. ग्रामपंचायत काळात हा रस्ता दहा फुटी होता. नगरपालिकेच्या काळात हा २0 फुटी झाला. पुढे प्रवीणसिंह परदेशी आयुक्त असताना या रस्त्याचे रुंदीकरण करून ८0 फुटी करण्यात आला. पुढे वाल्हेकरवाडी-चिंचवडेनगरचा काही परिसर प्राधिकरणाने केवळ कागदावर संपादित केला असल्याने पुढे या रस्त्याचे काम कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. असे असतानाही केवळ मानवतेच्या भावनेतून महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत होती. प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी शहरातील रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले. हा रस्ता रूंद करून ३४.५ मीटर करावा, असा प्रस्ताव तयार केला. मात्र, त्यानंतर कार्यवाही झाली नाही.

लाखो लिटर पाणी वाया

लाखो लिटर पाणी वाया: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडल्याने थरमॅक्स चौक ते आकुर्डी दरम्यानच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. शहरात एकीकडे पाणी मीटरने दिले जात असताना अशा प्रकारे झालेल्या पाण्याच्या अपव्ययास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एमआयडीसी परिसरात थरमॅक्स चौकाजवळ पाणीपुरवठा करणार्‍या वाहिनीला नवीन वाहिनी जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडून देण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून लाखो लिटर पाणी सोडले. रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही दिशेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एमआयडीसीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

- थरमॅक्स चौक ते आकुर्डी या रस्त्यावरील गटारीच्या चेंबरमधून निघून रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आकुर्डीहून थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याची एक बाजू पुर्णपणे पाण्यानी भरली होती. या पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करत होते.

विवाहितेला पेटविणार्‍या तिघांना अटक

विवाहितेला पेटविणार्‍या तिघांना अटक: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

निगडीतील ओटास्कीम येथे विवाहितेचे हातपाय बांधून तिला पेटविल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासर्‍याला अटक केली आहे. विवाहितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळासाहेब राजाभाऊ गालफाडे (२८), राजाभाऊ धोंडीबा गालफाडे (५५) आणि सविता राजाभाऊ गालफाडे (५0, तिघेही रा. विठ्ठल हौसिंग सोसायटी,ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विवाहितेला जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. प्रियंका गालफाडे (२२) असे विवाहितेचे नाव आहे.

फुलांची आवक मंदावली; भाजीपाला महाग

फुलांची आवक मंदावली; भाजीपाला महाग: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

गेल्या आठवड्यातील भाजीपाल्याचे दर ३ ते ५ रुपयांनी वाढले आहेत. फळभाज्याचे दर स्थिर असून, टोमॅटोची घसरण झाली असून ते ५ ते १0 रुपये किलो होता. डाळींब व सीताफळाचे दर २0 ते ३0 रुपयांनी वाढ झाली आहे. फुलांचे भाव सध्या स्थिर असून, आवक मंदावल्याने तसेच, गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर काहीसे वाढले आहेत. मेथी १0 ते १२, शेपू ५, कोंथिबीर १२ ते १५, पालक, कांदापाला १0 रुपये जुडी असा दर होता. मटार ५0 ते ६0, राजमा ४0, काळा घेवडा ४0 रुपये किलोने कायम होता. टोमॅटो ५ ते १0, बटाटा १८ ते २0, कांदा १0 ते २0, लसूण २0 ते ४0, वांगी २५, भेंडी २५, काकडी १0 ते १४, शेवगा ३0, घेवडा २0, मिरची १५ ते २0, सिमला मिरची ४0, कोंबी १२, गाजर ३0, तोडली ३0, कारले २५ ते ३0, प्लॉवर २0, भोपळा २0, रताळी ६0 रुपये किलो दर होता.

सीताफळ महागले मोसंबी १0 रुपयांनी महागली. डाळींब १00 ते १४0, सीताफळ ८0 ते १४0 रु. किलो दर आहे. सफरचंदाची मोठय़ा प्रमाणात कायम असल्याने ८0 ते १00 रुपये दर स्थिर होता. पपई २५ ते ३0, कलींगड १५ ते २0, खरबूज ३0, परदेशी संत्री १00 रुपये किलो आहे.

फुलांचे दर वाढण्याची शक्यता: गणेशोत्सव व गौरी गणपती सणामुळे फुलांची मागणी येत्या दोन दिवसांत मोठी वाढणार आहे. मात्र, पावसामुळे फुलांचे माल खराब झाल्याने त्यांची आवक मंदावली आहे. मागणीत वाढ होऊन दर वाढण्याची शक्यता विक्रेते विकास जाधव यांनी व्यक्त केली. गुलछडी २00 ते ३00, झेंडू २0 ते ५0, कोलकत्ता (पिवळा व लाल) झेंडू ४0 ते ५0 रुपये किलो दर होता. साधी गुलाब गडी २0 ते ३0, डच गुलाब गडी १00 ते १५0, जरबेरा ४0 ते ६0, अँस्टर २0 (शेकडा), गोल्डन शेवंती ८0 ते १00, पांढरा शेवंती १00 ते १५0, लिली गडी २0 ते ३0, गजरा गडी १५0 ते २00 रुपये दर आहे.

Pimpri corporators plan bandh against demolition drive

Pimpri corporators plan bandh against demolition drive: Opposition parties in Pimpri-Chinchwad have decided to organise a bandh to protest the demolition drive launched by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation.

Maken showers praise on Balewadi Sports Complex

Maken showers praise on Balewadi Sports Complex: The Balewadi Sports Complex — where three of India’s six Olympic medallists trained — was in for praise from the Union Sports Minister Ajay Maken, who made a visit to the Gun for Glory shooting championship.

Pradhikaran to build 1,200 houses

Pradhikaran to build 1,200 houses: PUNE: Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA)- Pradhikaran has decided to construct 1,200 houses in its proposed housing project at Walhekarwadi.

Helmets must for Pimpri Chinchwad civic staff

Helmets must for Pimpri Chinchwad civic staff: The campaign to promote helmets received another shot in the arm when PCMC commissioner issued a circular making it mandatory for PCMC staffers to wear helmets while riding two-wheelers.

राजस्थानी ढंगात पार पडला भादवी बीद महोत्सव

राजस्थानी ढंगात पार पडला भादवी बीद महोत्सव
पिंपरी, 17 सप्टेंबर
महापूजा, होमहवन, राजस्थानी लोकसंगीत, राजस्थानी भावगीतांच्या तालांवर देवदेवतांचे नृत्य, विनोदी नाट्य, गुणवंतांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सिरवी समाजाचा भादवी बीज महोत्सव आणि 24 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा कासारवाडीच्या श्री आई माताजी मंदिरात राजस्थानी ढंगात पार पडला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



क्रिसिलला मुदतवाढीचा घाट ; दरमहा पावणेनऊ लाखांचा खर्च

क्रिसिलला मुदतवाढीचा घाट ;दरमहा पावणेनऊ लाखांचा खर्च
पिंपरी, 17 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या 'जेएनएनयुआरएम' योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आराखडा तयार करणे, देखरेख ठेवणे तसेच अंमलबजावणीबाबत प्रशासनाला धोरणात्मक सल्ला देणा-या क्रिसिल या खासगी सल्लागार संस्थेला पुन्हा एका वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी या संस्थेला प्रति महिना आठ लाख 80 हजार रुपये याप्रमाणे वार्षिक एक कोटी पाच लाख 60 हजार रुपये आणि त्यावरील सेवाकर महापालिका अदा करणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया

जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया
पिंपरी, 16 सप्टेंबर
थरमॅक्सचौकाजवळ टाकण्यात आलेली एक नवीन जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून हे पाणी रस्त्यावर आल्याने थरमॅक्स चौक ते आकुर्डी दरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजुने नदीचे स्वरुप धारण केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


मंगलमूर्तींच्या पालखीचे श्री क्षेत्र मोरगावच्या दिशेने प्रस्थान

मंगलमूर्तींच्या पालखीचे <br>श्री क्षेत्र मोरगावच्या दिशेने प्रस्थान
पिंपरी, 16 सप्टेंबर
ढोल - ताशांचा गजर, आकाशात फडकणा-या भगव्या पताका, टाळ मृंदगासह पावलीचा झंकार, मोरया... मोरया... मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत सुमारे साडेचारशे वर्षापासून अवरित सुरू असलेला श्री मंगलमूर्ती पालखी सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भाद्रपद यात्रेसाठी चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातून श्री क्षेत्र मोरगावकडे निघाला. दरवर्षी भाद्रपद यात्रेसाठी पालखी सोहळा पायी जातो, मात्र यंदा प्रथमच भव्य रथातून श्री मंगलमूर्तीच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


सुरक्षितताच 'गॅस'वर !

सुरक्षितताच 'गॅस'वर !
तळेगावजवळ माळवाडी येथे गॅस टँकरने पेट घेतला तेव्हा पाच किलोमीटर अंतरावरील तळेगावमधून आगडोंब दिसत होते. खंडाळ्यात गॅस टँकरला अपघात झाल्यामुळे गॅस गळती सुरू झाल्याची 'ब्रेकिंग न्यूज' एमपीसी न्यूजच्या माध्यमातून समजली, तेव्हा डोळ्यासमोर आला माळवाडीतील गॅसचा आगडोंब. अपघात खंडाळा गावात झालेला असल्याने पोटात धस्स झाले. काही केल्या गॅसगळती थांबत नव्हती. खंडाळ्यातील रहिवाशांची सुरक्षितता अक्षरशः 'गॅस'वर होती. माळवाडी येथे झालेल्या अपघातानंतर पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव येथेही गॅसगळतीची दुर्घटना घडली होती. मागील महिन्यात निगडीजवळ देहूरोड जकातनाका येथे अतिज्वालाग्राही रसायनाची गळती झाली होती. खंडाळ्याच्या दुर्घटनेनंतर दोनच दिवसांत देहूरोड येथे गॅस टँकर उलटला. तेव्हाही परिसरातील रहिवासी 'गॅस'वर होते.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in