Thursday 22 November 2012

पिंपरीत एक लाख दुबार मतदार नावे

पिंपरीत एक लाख दुबार मतदार नावेपिंपरी - शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत एक लाख आठ हजार दुबार नावे आढळली आहेत. पहिल्या टप्प्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 32 हजार दुबार मतदारांची शहानिशा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्याचा मंगळवारी (ता. 20) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर दुबार मतदारांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी, भोसरी, आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघांत तब्बल एक लाख आठ हजार दुबार मतदार असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले.

अमेरिकेतील अनेक प्रकल्प शहरात राबविणे शक्‍य

अमेरिकेतील अनेक प्रकल्प शहरात राबविणे शक्‍य पिंपरी - पर्यायी उत्पन्न स्रोत, सांडपाणी, घनकचरा आणि आपत्कालीन व्यवस्थापन, नगररचना व सार्वजनिक वाहतूक, असे अमेरिकेतील अनेक प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये राबविणे शक्‍य असल्याचे मत आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्‍त केले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर डॉ. परदेशी यांनी सोमवारी (ता. 19) आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

"केवायसी'चा बाऊ नको

"केवायसी'चा बाऊ नकोगॅस वितरकांकडून सरसकट सर्वांना केवायसी (नो यूवर कस्टमर) अर्ज भरून देण्याची सक्ती केली जात असून, हा अर्ज भरून दिला नाही, तर व्यावसायिक दरात सिलिंडर घ्यावा लागेल, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. वस्तुत: एका कुटुंबाकडे एकच गॅसजोड असल्यास त्यांनी तूर्त "केवायसी' भरून देण्याची गरज नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वितरक विनाकारण त्रास देत असतील, तर जिल्हा प्रशासन वा गॅस कंपन्यांशी संपर्क साधावा. 
- संतोष शाळिग्राम 

१७९ रिक्षाचालकांवर कारवाई

१७९ रिक्षाचालकांवर कारवाई: प्रवासी नाकारणा-या सुमारे १७९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात येणार आहे. रिक्षाचालकांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. नजिकच्या काळात अचानकपणे ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

Voter registration: Over 2 lakh applications received

Voter registration: Over 2 lakh applications received: ADMN has received 1,83,452 application for inclusion of names, while there were a total of 10,791 names for deletion and 21,267 applications for correction

कसाबला फाशी दिली हे चांगलेच झाले, पण.... !

कसाबला फाशी दिली हे चांगलेच झाले, पण.... !
पिंपरी, 21 नोव्हेंबर
मुंबईमध्ये झालेल्या 26/11 हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला आज (बुधवारी) सकाळी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. या फाशीनंतर देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरातही जल्लोश, आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. फाशी देण्यासाठी उशीर झाल्याची खंत, त्याला जगजाहीर फाशी देण्याची इच्छा आणि त्याचा दफनविधी येरवड्यात करायला नको अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त करत शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
पिंपरी, 20 नोव्हेंबर
पोलीस असल्याची बतावणी करून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने लुटणारी चार जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. भिवंडीतील एका सराफासह तीन सराईत गुन्हेगारांकडून तब्बल 20 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून एक किलो सोन्याचे दागिने, सोन्याची लगडी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने अशा सुमारे 35 लाख रुपयांच्या ऐवजाची 'रिकव्हरी' पोलिसांनी केली आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिका सभेत अश्रू अन् शब्द सुमनांची श्रध्दांजली !

महापालिका सभेत अश्रू अन् शब्द सुमनांची श्रध्दांजली !
पिंपरी, 20 नोव्हेंबर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वगाथेची शब्दसुमने आणि आठवणींमुळे दाटून आलेल्या अश्रूंनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची सभा आज (मंगळवारी) गहिवरली. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता पुन्हा होणे शक्य नाही, अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण करताना महापौरांसह सर्वपक्षिय नगरसेविकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अमली पदार्थाच्या विरोधात तरुणांची मानसिकता बदलणे गरजेचे

अमली पदार्थाच्या विरोधात तरुणांची मानसिकता बदलणे गरजेचे
पिंपरी, 20 नोव्हेंबर
पुण‍े आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे पसरले आहे. त्याविरोधात पोलिसांनी गेल्या जानेवारीपासून केलेली कारवाई अमली पदार्थ विक्रेत्यांच्या जाळ्यापुढे तोकडी पडल्याचे दिसुन येते. त्यामुळे अमली पदार्थ बंदी कायद्याबरोबरच आजच्या तरुणाईची मनोवृत्ती बदलणे गरजेचे आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

सोनसाखळी चोरीच्या 96 गुन्ह्यांपैकी तपास 'अबतक 41' !

सोनसाखळी चोरीच्या 96 गुन्ह्यांपैकी तपास 'अबतक 41' !
पिंपरी, 20 नोव्हेंबर
महिलांचा बेसावधपणा, गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलिसांना येणार अपयश यामुळे सोनसाखळी चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिमंडळ तीनच्या हद्दीत चालू वर्षात आजपर्यत सोनसाखळी चोरीचे एकूण 96 गुन्हे पोलिसांकडे दाखल आहेत. चिंतेची बाब म्हणजे यापैकी फक्त 41 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

गर्भवती पत्नीचा खून

गर्भवती पत्नीचा खून: वाकड । दि. १९ (वार्ताहर)

जावई आणि त्याच्या कुटुंबीयांनी गर्भवती मुलीला पंख्याला लटकावून तिचा खून केल्याची तक्रार राज्य शेळी, मेंढीपालन महामंडळाचे अध्यक्ष रामराव सखाराम वडकुते यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास थेरगावात हा प्रकार घडला.

याप्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरकडून वेळोवेळी होणारी पैशांची मागणी आणि मुंबई येथील फ्लॅट केवळ जावयाच्या नव्हे, तर जावई व मुलीच्या नावे केल्याच्या रागातून हा खून झाल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे. दरम्यान, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने एका लॉजच्या टेरेसवर जाऊन स्वत:वर वार करून, तसेच त्यानंतर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. डांगे चौकातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस निरीक्षक परशराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराव सखाराम वडकुते (५८, रा. कल्याणनगर, परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. ते राज्य शेळी,मेंढीपालन महामंडळाचे अध्यक्ष असून, वैशाली विजय थोरात (२६) असे त्यांच्या मृत विवाहित मुलीचे नाव आहे. विजय संभाजी थोरात (३४, दोघेही रा. सोलाना प्रोजेक्ट, संतोष मंगल कार्यालयासमोर, फ्लॅट क्र. ६0३, थेरगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या जावयाचे नाव आहे. त्याच्यासह संभाजी थोरात (सासरा), शकुंतला संभाजी थोरात (सासू), प्रमोद संभाजी थोरात (दीर), जाऊ भाग्यश्री प्रमोद थोरात (सर्व रा. मालेगाव रोड, नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रमोद यास अटक केली आहे.

बालहक्कासाठी झटणार्‍यांना धमक्यांचे इनाम

बालहक्कासाठी झटणार्‍यांना धमक्यांचे इनाम: प्रवीण बिडवे । दि. १९ (पिंपरी)

बालहक्कासाठी झटणार्‍या स्वयंसेवी संस्था व पदाधिकार्‍यांना समाजकल्याण विभाग आणि पोलिसांनी वार्‍यावर सोडले आहे. बालहक्काची चळवळ सुरू ठेवणे जोखमीचे ठरू लागल्याने बालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्‍या संस्था मावळतीला जाताना दिसत आहेत. बालकामगारांच्या पिळवणुकीची माहिती देणार्‍यांना ‘धमक्यांचे इनाम’ मिळू लागल्याने या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे येणेच पसंत केले आहे. परिणामी शहरात बालहक्क चळवळ संथ झाल्याचे खेदजनक वास्तव बालकहक्क दिनाच्या पूर्वसंध्येला पुढे आले आहे.

‘समान शिक्षण समान प्यार, हर बच्चे का है अधिकार’ हा मंत्र अंगीकारून बालहक्क अभियान पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहे. बाल्यावस्थेतील मुला-मुलींना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांकडून होणारी अमानूष मारहाण, हॉटेल-वीटभट्टय़ांपासून ते मोठय़ा कारखान्यांतही बालकामगारांचे होणारे शोषण या विरोधात आवाज उठविण्याचे काम बालहक्क अभियान गेली अनेक वर्षे करीत आहे.

२00९ मध्ये शहरातील दोन कुपोषित बालके उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या अभियानाने कुपोषण रोखण्याकडे लक्ष केंद्रित केले. शहरातील १५ ठिकाणी बाल पंचायत गट स्थापन करण्यात आले. थेरगाव, काळा खडक, म्हातोबानगर, सुभेदार रामजी आंबेडकरनगर, भीमनगर, विठ्ठलनगर, वेताळनगर, आनंदनगर, गांधीनगर, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, तापकीरनगर झोपडपट्टी, संजय गांधीनगर, वाकड येथील संघर्षनगर, बौद्धनगर, नाणेकर चाळ येथून गट काम करू लागले. जन्माला येणारे अर्भक कुपोषित नसावे यासाठी मातेला गर्भावस्थेपासूनच सकस आहार पुरविण्यात पुढाकार घेतला. अपहरण झालेल्या बालकांची सुखरूप सोडवणूक करण्यातही अभियानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

ऊसतोडणी मजुरांची मुले, बांधकाम प्रकल्प, कारखाने, हॉटेल व्यवसायासह अन्य व्यवसायांतील बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मुख्य उद्देशाने अभियान कार्यरत होते.

अभियानाचे जिल्हा निमंत्रक श्रीधर काळे म्हणाले, ‘‘सुटका केलेल्या बालकामगारांना सुधारगृहात पाठविण्याऐवजी त्यांना निवासी शाळेत पाठवावे असे धोरण शासनाने २00९ मध्ये जाहीर केले. परंतु बहुतांश ठिकाणी निवासी शाळा कागदावरच राहिल्या. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी अभियानातर्फे देशभर आंदोलन झाले. पुण्यात शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळावर मोर्चा काढण्यात आला. तेव्हा आंदोलकांना गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांनी मारहाण केल्याने कार्यकर्ते धास्तावले. पिळवणुकीची माहिती देणार्‍यांना कारखानदार व व्यावसायिकांकडून धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चळवळीचे कार्य मंदावले.

फिर्यादी व्यावसायिकांच्या रोषाचे धनी

- बालकामगारांच्या पिळवणुकीसंदर्भात अभियानाचे पदाधिकारी कामगार आयुक्तालयास कळवितात. त्यानंतर कामगार आयुक्तालयाचा प्रतिनिधी, पोलीस आणि अभियानाचा प्रतिनिधी असे तिघांचे पथक छापे टाकून बालकामगारांची सोडवणूक करते. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. परंतु अशा प्रकरणांत अभियानाच्या पदाधिकार्‍यांना फिर्यादी करण्यात आले. त्यांची नावे उघड झाली. परिणामी हे पदाधिकारी ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्या रोषाचे धनी ठरू लागले.

बंधुता साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी अँड. पानसरे

बंधुता साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी अँड. पानसरे: पुणे। दि. १९ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवडमध्ये जानेवारीत होणार्‍या चौदाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते अँड. गोविंद पानसरे यांची निवड करण्यात आली. स्वागताध्यक्षपदी शिक्षणतज्ञ हरिश्‍चंद्र गडसिंग यांची निवड झाली.
अँड. पानसरे लेखक, विचारवंत व उत्तम वक्ते आहेत. कामगार व कष्टकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अनेक लढे उभारले आहेत. त्यांची २१ पुस्तके प्रसिद्ध झाली असून लेखन कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत.

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई: पुणे। दि. १९ (प्रतिनिधी)

स्टँडवर उभ्या असणार्‍यांकडून प्रवाशांना भाडे नाकारणार्‍या २00 रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली असून, त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याची शिफारस आरटीओकडे करण्यात येणार आहे.

प्रवाशांची वाट पाहत असतानाही जवळचे भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे पैसे न घेता जादा भाडे मागणे, नाही तर नकार देणे अशा रिक्षाचालकांविषयींच्या अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. प्रवाशांना आपल्या कामाला जाण्याची घाई असल्याने ते त्याच वेळी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसत. रिक्षाचालकांविरुद्धच्या या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी आजपासून या प्रकाराविरुद्ध मोहीम उघडली.

भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना पकडण्यासाठी त्यांनी युक्ती केली. रिक्षा स्टँडवर थांबलेल्या रिक्षाचालकांकडे साध्या वेशातील वाहतूक शाखेचे कर्मचारी, वाहतूक मित्र गेले. त्यांनी त्या त्या परिसरातील ठिकाणी जायचे असल्याचे सांगितले.

काही जणांनी त्यांना प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी सोडले. मात्र, ज्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाण्यास नकार दिला अशा वेळी त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले व संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली. आज दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी या पद्धतीने रिक्षाचालकांची परीक्षा पाहण्यात आली. त्यात काही पासही झाले. मात्र, पास झालेल्या रिक्षाचालकांची नोंद ठेवण्यात आलेली नाही. वाहतूक शाखेच्या परीक्षेत नापास झाल्याने २00 जणांना कारवाईला सामोरे जावे लागले. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, सामान्य नागरिकही याबाबतच्या तक्रारी २६१२२000 किंवा २६२0८२२५ या क्रमांकावर कळवू शकतील, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्‍वास पांढरे यांनी सांगितले. रिक्षाचालकांबरोबरच पुढील दीड महिन्यात पदपथावरून वाहन चालविणे, पदपथावर वाहन पार्क करणे, रस्त्याच्या वळणावर, बसथांब्यावर वाहन पार्क करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे असे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दीड महिना चालणार मोहिम

वर्षाअखेरीस मद्यपान करुन वाहन चालविणार्‍यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहनचालकांना शिस्त लागावी या हेतूने वाहतुक शाखेच्या वतीने पुढील दीड महिना बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहिम राबविली जाणार आहे. त्यात दुचाकी वाहनांबरोबरच मोटारी, ट्रक, टेम्पो, बस यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. मोटार चालविताना सिटबेल्ट न वापरणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहर, उपनगर तसेच पिंपरी चिंचवड परिसरात आज दिवसभरात सुमारे २00 रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारस प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात येणार आहे. विश्‍वास पांढरे -उपायुक्त, वाहतूक शाखा

32 dengue cases in PCMC areas in Nov

32 dengue cases in PCMC areas in Nov: The number of patients suffering from dengue has risen sharply in Pimpri-Chinchwad this month.

Brace for higher power tariff if Pune Municipal Corporation hikes road-digging charges

Brace for higher power tariff if Pune Municipal Corporation hikes road-digging charges: The distribution company has proposed underground high and low tension cables of 645 km length in Pune and Pimpri Chinchwad under two phases of its infrastructure development plan.

‘He visited Pimpri only once, but left his imprint...’

‘He visited Pimpri only once, but left his imprint...’: Balasaheb Thackeray visited Pimpri-Chinchwad only once — to inaugurate two Sena shakhas at Phugewadi and Bhosari in 1986.

'अमेरिका रिटर्न' आयुक्तांचे कर उत्पन्न वाढीचे सुतोवाच

'अमेरिका रिटर्न' आयुक्तांचे कर उत्पन्न वाढीचे सुतोवाच
पिंपरी, 19 नोव्हेंबर
अमेरिकन लोकांमध्ये कर भरण्याबाबत जागरुकता आहे. 99.99 टक्क्यांपर्यंतची करवसुली होते. शहर विकासासाठी करभरणा वाढला पाहिजे, इतर उत्पन्नाचे स्त्रोत वाढले पाहिजेत, असे सांगत अमेरिका दौ-यावरुन परतलेले महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कर उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरविण्याचे सुतोवाच आज (सोमवारी) केले. शाश्वत विकासासाठी अमेरिकेप्रमाणे प्रशासकीय कामकाजात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद करताना पर्यटन विकासाला चालना, वाहतूक, कच-यावर प्रक्रिया, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आदी तेथील गोष्टी आपल्याला भावल्याचे त्यांनी नमूद केले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी, 19 नोव्हेंबर
कौटुंबिक वादानंतर पत्नीचा खून करून पतीने आपल्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी (ता.18) घडली. या प्रकरणी पत्नीच्या वडिलांनी मुलीचा छळ करून खून केल्याचा आरोप केला आहे. हिंजवडी पोलिसांनी पतीसह सासू, सासरे, दीर आणि भावजय यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दिराला पोलिसांनी अटक केली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अमली पदार्थांच्या 'उद्योगा'चा उद्योगनगरीला विळखा

अमली पदार्थांच्या 'उद्योगा'चा उद्योगनगरीला विळखा
पिंपरी, 19 नोव्हेंबर
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला अमली पदार्थांनी चांगलाच विळखा घातला आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांरस्त्यांवर अमली पदार्थ विक्रेत्यांनी आपले चांगले बस्तान बसविले आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड मधील पिंपरी, निगडी, हिंजवडी तसेच पुणे परिसरातील वाकडेवाडी, कर्वेनगर, बुधवार पेठ, पुणे लष्कर परिसरात गांजा, चरस आणि इतर अमली पदार्थ आता सहजपणे उपलब्ध होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी-चिंचवडकरांचा स्वयंस्फूर्तीने बंद ; उद्योगनगरी स्तब्ध

पिंपरी-चिंचवडकरांचा स्वयंस्फूर्तीने बंद ; उद्योगनगरी स्तब्ध
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
पिंपरी, 18 नोव्हेंबर
उद्योग, बाजारपेठा, शॉपिंग मॉल तसेच अगदी खासगी वाहतूकही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी आज (रविवारी) शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यामुळे उद्योगनगरीत दिवसभर भयाण सन्नाटा पसरला होता. कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा संघटनेच्या आक्रमतेखेरीज स्वयंशिस्तीत पाळलेला हा बंद ऐतिहासिक ठरला.

एसटीच्या दापोडी कार्यशाळेची बेकायदा वृक्षतोड ; महापालिकेची नोटीस

एसटीच्या दापोडी कार्यशाळेची बेकायदा वृक्षतोड ; महापालिकेची नोटीस
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
पिंपरी, 18 नोव्हेंबर
धोकादायक फाद्यांच्या तोडणीसाठी महापालिकेने परवानगी दिली असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) दापोडी कार्यशाळेने बेकायदेशीर पुर्णपणे वृक्षतोड केल्याचे मनसेने उघडकीस आणले आहे. महापालिकेने दापोडी कार्यशाळेला 'कारणे दाखवा' नोटीस बजाविली आहे.

नटवरलाल'ची शहानिशा करण्यासाठी भोसरी पोलिसांचे पथक दिल्लीला जाणार

नटवरलाल'ची शहानिशा करण्यासाठी भोसरी पोलिसांचे पथक दिल्लीला जाणार
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 17 नोव्हेंबर
स्वत:चे नाव, रूप, वेश बदलून महाराष्ट्रातील नागपूर, रत्नागिरी व अन्य शहरात सुमारे पंधराशे कोटींहून अधिक रूपयांचा गंडा घालणा-या 'नटवरलाल'ला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले. स्टेशनरी व्यवसायात 10-20 टक्के नफा मिळवून देतो, असे सांगून पिंपरी-चिंचवड, राजगुरूनगर, चाकण आणि सातारा जिल्ह्यातील डझनभर गुंतवणूकदारांची 14 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आठ महिन्यांपासून भोसरी पोलिसांसाठी 'वॉन्टेड' असलेला 'या' बंडलबाजाची शहानिशा करण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक दिल्लीला पाठविणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी शनिवारी (दि. 17) दिली.

लाखमोलाची हानी

लाखमोलाची हानी !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 17 नोव्हेंबर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे कधीही न भरुन निघणारी लाखमोलाची हानी झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेसह भाजप, आरपीआय, मनसेने नोंदविली. महापौर मोहिनी लांडे यांनीही दुःख व्यक्त केले.

कामगारनगरीत भगवा फडकाविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

कामगारनगरीत भगवा फडकाविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले...!
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 17 नोव्हेंबर
जेव्हा महापालिकेवर भगवा फडकेल तेव्हाच मी पिंपरी-चिंचवडमध्ये पाय ठेवेल, असा संकल्प शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये येण्याचा आग्रह धरणा-या स्थानिक शिवसैनिकांनाही ते वारंवार याबाबत ठणकावून सांगत. मात्र गेली काही दिवस मृत्युशी झुंजताना त्यांची आज (शनिवारी) प्राणज्योत मालवली अन् त्यांचे कामगारनगरीत भगवा फडकाविण्याचे स्वप्न अधुरेच राहिले...!

पुण्यात 'लखोबा लोखंडे'ने घातला 14 कोटींचा गंडा

पुण्यात 'लखोबा लोखंडे'ने घातला 14 कोटींचा गंडा
पिंपरी, 16 नोव्हेंबर
स्वतःचे नाव, चेहरा आणि वेशभूषा बदलून शेवटी 'तो मी नव्हेच' असं ठासून सांगणा-या एका 'लखोबा लोखंडे'नं पुणे आणि सातारा परिसरातील 15 ते 20 नागरिकांना सुमारे 14 कोटींचा गंडा घातला आहे. भोसरी पोलिसांसाठी आठ महिन्यांपासून 'वॉन्टेड' असलेला आणि देशभरात हजारो कोटींचा गंडा घालणारा हा भामटा अखेर दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. स्टेशनरी व्यवसायात 10 ते 20 टक्के नफ्याच्या लालसेनं पुण्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण, राजगुरूनगर या भागातील तसेच सातारा जिल्ह्यातील व्यावसायिक, नोकरदार, शेतक-यांनी या 'श्री 420'च्या नादी लागून आपली कोट्यवधी रुपयांची 'कष्टाची कमाई' गमावली आहे. आता हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यामुळे आपले पैसे परत मिळण्याची आशा त्यांना वाटू लागली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in