Saturday 27 July 2013

पुण्यातील ८० उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र

महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा तपशील मुदतीत न देणाऱ्या पुण्यातील ८० व पिंपरी-चिंचवडमधील ७८ उमेदवारांना पुढील तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत.

औद्योगिक मंदीचे सावट आणि 'शट डाऊन'

काम कमी झाल्याने छोटे-मध्यम उद्योगही अडचणीत
मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीच्या चाकण प्रकल्पातील 22 ते 27 जुलै दरम्यान जाहीर केलेला 'शट-डाऊन' संपत आलेला असतानाच टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी-चिंचवडमधील कार प्लँटमध्येही सहा दिवसांचा 'ब्लॉक

वाल्हेकरवाडी येथून पीएमपीएमएलची ...

पीएमपीएमएलच्या वतीने रावेत आणि वाल्हेकरवाडीसह परिसरात बस सुरू करण्यात आली आहे. बस सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड किवळे मंडलातर्फे गुरुवारी (दि. 25 चिंचवडगाव येथील बसथांब्यावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्याची दखल घेत ही बससेवा आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात आली

आयुक्तांच्या 'कारणे दाखवा'ला तीन महिन्यानंतर उत्तर

आरोग्य निरीक्षकाच्या खातेनिहाय चौकशीचे दोषारोपपत्र तब्बल चार महिने उशिरा सादर केल्याप्रकरणी क प्रभागाचे प्रभारी प्रभाग अधिकारी दत्तात्रय फुंदे यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. 15 दिवसात याबाबतचा खुलासा करण्याचे आदेशही दिले. मात्र, फुंदे यांनी या नोटीशीला तीन महिन्यानंतर उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी

बूथ विस्तारातून कार्यकर्त्यांनी ...

भाजपाची भोसरी विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी  
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करताना स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने बुथ विस्तार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत घराघरात जाऊन माणसे जोडण्याचे

'भक्ती-शक्ती चौकात खाद्यपदार्थ ...

महापालिकेच्या भक्ती-शक्ती उद्यानाजवळ कायमस्वरूपी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भक्ती-शक्ती हातगाडी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महापौर मोहिनी लांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महापालिकेने निगडी

सुट्टीच्या दिवशी वीजबिलभरणा ...

वीजग्राहकांच्या सोयीसाठी पुणे परिमंडळामधील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्र  शनिवारी ( दि.27) व रविवारी (दि. 28) रोजी सुरु राहणार आहेत.
महावितरणच्या वतीने वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील महावितरणाचे आणि इतर अधिकृत वीजबिल भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळात सुरु राहतील.

शिवसेना प्रभाग अकराच्या वतीने ...

शिवसेना प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने रविवारी (28 जुलै) रोजी निगडी येथील सेक्टर नंबर 22 मध्ये गुणवंत विद्यार्थी, पालक व गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका संगीता पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महेशनगर येथील हातगाड्यांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज (दि. 26) मोहननगर, संततुकाराम नगर येथील हातगाड्यांवर कारवाई केली.
महेशनगर येथील मोकळ्या जागेत उभ्या असणार्‍या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्याने ही कारवाई झाली.  या कारवाईत हातगाडी धारकांच्या छत्र्या, टेबल, कापड इत्यादी सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त करण्यात आले.

सोमवारपासून महापौर चषक ...

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने 29 ते 31 जुलै या कालावधीमध्ये महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2013 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.

महावितरणकडून 562 फिडर पिलरची दुरुस्ती

वीज वितरण यंत्रणेत महत्त्वाचे काम करणा-या फिडर पिलरचे सर्वेक्षण करुन दुरुस्तीची कामे महावितरणाकडून करण्यात आली आहेत. या अंतर्गत गेल्या महिनाभरात पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 562 फिडर, मिनी फिडरची दुरुस्ती करण्यात आली.

पुणे, पिंपरीत ८ ऑगस्टला रिक्षाबंदचा निर्णय

पिंपरी : ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नेते शरद राव आणि महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्टला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. 
१ ऑगस्टला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा चालक मालकांची भूमिका ठरवण्यासाठी शहरातील स्टँड अध्यक्ष/सचिव यांची बैठक रविवार, दि. २८ जुलैला दुपारी २ वाजता पिंपरी येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यालयात आयोजित केली आहे. या वेळी पंचायत अध्यक्ष आणि कृती समितीचे राज्य सरचिटणीस कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 

खड्ड्यांवरून पिंपरीत प्रशासन धारेवर

पिंपरी -&nbsp डांगे चौकातील अपघातात एकाचा बळी गेला आहे.

प्राप्तिकर कार्यालयांत 'रिटर्न' भरण्यासाठी सुविधा

पिंपरी -&nbsp प्राप्तिकर खात्याच्या वतीने प्राप्तिकराचे विवरण पत्र (रिटर्न) भरण्यासाठी प्राप्तिकर कार्यालयांमध्ये विशेष सोय करण्यात आली आहे.

पिंपरी महापालिका देणार पीएमपीला 22 कोटी

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विनंतीवरून "पीएमपीएमएल'तर्फे विद्यार्थी, अंध व पत्रकारांना देण्यात येणाऱ्या मोफत पाससाठी 22 कोटी रुपये देण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

'घरकुला'साठी महापालिका देणार प्राधिकरणास 25 कोटी

पिंपरी -&nbsp 'घरकुला'च्या जागेसाठी प्राधिकरणास 25 कोटी रुपये देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता.

टाटा मोटर्सच्या कार प्लांटचा सहा दिवसांचा ब्लॉक क्‍लोजर

पिंपरी -&nbsp टाटा मोटर्स कंपनीचा चिखलीतील कार प्लांट 26 ते 31 जुलै दरम्यान सहा दिवस बंद ठेवण्यात आला आहे.

जनता संपर्क अधिकारी गायकवाड यांच्यावर गुन्हा

पिंपरी -&nbsp विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याविरोधात संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संस्कार भारतीच्या पिंपरी-चिंचवड ...

कला व कलाकरांना व्यासपीठ देणारी संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या पिंपरी -चिंचवड शाखेचे उद्‌घाटन निगडी येथे शनिवारी (दि. 27) जनसेवा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते होत आहे.

भीमशाही युवा संघटनेच्या वतीने ...

नाशिकफाटा उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भीमशाही युवा संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.27)  पिंपरी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांनी दिली आहे.

'लाख'मोलाचे दान


पिंपरी - चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण मेडिकल हॉस्पिटल आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सामंजस्य करारातून पिंपरीत पीजी इन्स्टिट्यूट सुरू होत आहे . डॉ . वांगीकर तेथे डीन होत आहेत .