Friday 20 December 2013

Sangvi-Kiwale BRT route to go operational first

The Bus Rapid Transit (BRT) route in Pimpri Chinchwad will be made operational first on the 14.5 km Sangvi-Kiwale stretch by April. Earlier, the civic body had wanted to start the service on the Nigdi-Dapodi BRT route.

Three traders pay Rs 32 lakh in LBT raids

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) recently raided shops and business establishments of three traders for evasion of Local Body Tax and recovered dues worth Rs 32.30 lakh.

32000 unassessed properties in Pune, Pimpri Chinchwad


PUNE: There are around 32,000 residential and commercial properties unassessed for property tax in Pune and Pimpri Chinchwad, revealed two separate surveys conducted by the municipal corporations. Of the 32,000 properties, 10,000 are in Pune ...

मोदींच्या सभेसाठी उद्योगनगरीतून दहा हजार कार्यकर्ते

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची येत्या रविवारी (दि. 22) मुंबई येथे होणा-या महागर्जना रॅली सभेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मिळकत कर थकबाकीदारांच्या दारात वाजवणार बँड

मिळकर कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. महापालिका येत्या 15 जानेवारीपासून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजविणार असून त्यासाठी दहा पथके नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पाणीपुरवठा विभाग; ५0 जणांना नोटीस

पिंपरी : नियमित पाणीपट्टी वसुलीबरोबर पाणीपट्टी थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागाची पीछेहाट झाली आहे. ८२ कोटी ६८ लाखांच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीचे आव्हान या विभागापुढे आहे. या विभागाच्या कामकाजाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून आयुक्त श्रीकर परदेशी यांनी प्रमुख अधिकारी, अभियंते, मीटर निरीक्षक, कर्मचारी अशा एकूण ५0 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एकाच वेळी एकाच विभागातील अनेक लोकांना नोटीस प्राप्त झाल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेच्या चारही प्रभागांत प्रत्येकी १५ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. अ प्रभागात २२ कोटी ३८ लाख, ब प्रभागात २२ कोटी ७४ लाख, क प्रभागात २0 कोटी ८५ लाख आणि ड प्रभागात १६ कोटी ६१ लाखांची अशी मिळून चारही प्रभागात ८२ कोटी ६८ लाखांची थकबाकी आहे. 

आकुर्डी येथे शनिवारी वाहतूक विषयक व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्या हाताळण्यासाठी नागरी शिस्त व मानसिकता बनविण्यासाठी लोकशिक्षण महत्त्वाचे आहे.  शालेय स्तरावर शिक्षकांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शनिवारी (दि. 21) व्याख्यानाचे आयोजन केले आहे.