Saturday 3 May 2014

Partly-done NH4 certified as complete

Shalak Agarwal, a trader and his son Vinay, who had filed the RTI application, told reporters that MSRDC had taken over the widening work by signing an agreement with the National Highway Authority of India (NHAI).

अबब 'कागदोपत्री' चौपदरीकरण झालेल्या रस्त्याचे पुन्हा चौपदरीकरण

'एमएसआरडीसी'चा प्रताप कोट्यवधींचा घोटाळा
'कायद्याचे बोला' हा सिनेमा तुम्ही पाहिलाय. त्या सिनेमात केवळ कागदपत्रांच्या आधारे विहीर खोदल्याचे सांगून अनुदान लाटणा-या शासकीय यंत्रणेवर झणझणीत अंजन घातले आहे. या सिनेमासारखेच प्रत्यक्षात घडले आहे. शिळफाटा ते निगडी या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याचे दाखवून 2006 पासून बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरु आहे. प्रत्यक्षात देहूरोडपासून निगडीपर्यंत हा चौपदरी रस्ताच अस्तित्वात नाही. हे कमी पडते म्हणून की काय याच रस्त्यांतर्गत येणा-या देहूरोड ते निगडी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 41 कोटी खर्चाला एमएसआरडीसीने केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी मिळविली आहे.

Chairpersons of zonal panels elected

Chairpersons of five of the six zonal committees of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) were elected unopposed on Monday.While five chairpersons are of the NCP, one is of the Congress.

गप्पांमधून जाणून घेतला माहितीचा अधिकार

'माहिती अधिकार कट्टा' उपक्रम
सायंकाळची वेळ..., युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक एकाच कट्ट्यावर जमले..., त्यांच्यात गप्पाही रंगल्या होत्या..., लोकसभा  अथवा अन्य कोणताही विषय त्यांच्या चर्चेला नव्हता..., विषय होता तो माहिती अधिकाराच्या वापराचा...,निमित्त होते पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे आयोजित 'माहिती अधिकार कट्टा' उपक्रमाचे. महिन्यातून दोन रविवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे.    

पिंपरीतील ‘बीआरटी’मुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष?

पिंपरी-चिंचवड शहरातून बीआरटी सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच उद्भवणारे धोके याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

घरकुलाच्या 672 सदनिकांची बुधवारी सोडत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुढील टप्प्यातील 672 सदनिकांच्या वाटपासाठी बुधवारी (दि. 7) सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी बारा वाजता सोडत होणार आहे. महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येईल.

क्रीडा सुविधांच्या दरवाढीला मनसेचा विरोध

जलतरण तलावासह विविध खेळांच्या सोयीसुविधांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या भरमसाठ शुल्कवाढीला मनसेने विरोध केला आहे. महापालिकेचे हे धोरण क्रीडापटू घडविण्यात बाधा आणणारे असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

युवकांमध्ये विज्ञाननिष्ठेची गरज - डॉ. विश्वंभर चौधरी

युवकांमध्ये विज्ञाननिष्ठा असणे आवश्यक आहे आणि तसे झाल्यास आपण चांगली प्रगती करु शकतो असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि.1) चिंचवड येथे मैत्री प्रतिष्ठान व श्री दत्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमितात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र माझा' या विषयवार ते बोलत होते.