Tuesday 20 May 2014

बीआरटी 'असून अडचण नसून खोळंबा'

बीआरटीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बीआरटीच्या प्रकल्पामुळे रस्ता छोटा झाला असून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हिस रस्ता हा 50 टक्के कमी झाला असून वाहतूक मात्र तेवढ्याच प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. बीआरटीमुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा अंदाज होता. परंतू सध्याच्या बीआरटीच्या कामामुळेच वाहतूक कोंडीची समस्या दिसून येत आहे. रस्त्यालगत 'नो पार्किंग' असताना देखील नागरिक रस्त्यालगत वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

अपयशामुळे ‘राष्ट्रवादी’ खचली

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेली राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेतील दारुण अपयशामुळे खच्ची झाली आहे. तर, निवडक नगरसेवकांच्या बळावर घवघवीत यश मिळविलेल्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे.

अन्नधान्य वितरण कार्यालयांत CCTV

अन्नधान्य वितरण विभागाच्या कार्यालयांमधील एजंटांना आळा घालण्यासाठी शहर व पिंपरी-चिंचवडमधील आठही परिमंडळ कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील फुटेजच्या आधारे एजंटवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.

PCMC completes 75 pc pre-monsoon work

Pimpri: About 75 per cent of pre-monsoon work of cleaning the drains have been completed by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

Alarm bells ring for NCP in Pimpri-Chinchwad

Pimpri: Alarm bells have started ringing for the Nationalist Congress Party (NCP) in Pimpri-Chinchwad, following the party's poor performance in the Lok Sabha polls.

त्रिवेणीनगर ते भक्ती-शक्ती चौक रस्ता कधी होणार दुरुस्त?

स्थानिक नागरिकांची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड  नवनगर विकास प्राधिकरण यांच्या भांडणात शहरातील रस्त्याची डागडुजीकडे दुर्लक्ष होत असून  त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. मोठमोठे रस्ते गुळगुळीत असले तरीही अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सध्या मेट्रोसिटीच्या दिशेने होत आहे. शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. तेंव्हा अतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीकडेही दोन्ही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून सोमवारपासून प्राण्यांचे मोफत लसीकरण

पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पशूसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 21 मे या कालावधीत महापालिका हद्दीतील गाई, म्हैस आणि बैल यांना लाळ्या आणि खुरकूत मोफत लसीकरण केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे म्हणाले की, लाळ्या व खुरकुत या संसर्गजन्य रोगामुळे जनावरांच्या तोंडामध्ये आणि खुरामध्ये व्रण उद्‌भवतात. जनावराच्या तोंडावाटे लाळ वाहते. त्यामुळे जनावरांना चारा खाताना त्रास होतो. खुरामध्ये फोड येतात. खुरामध्ये व्रण झाल्याने जंतूंचे प्राबल्य वाढते आणि संसर्ग होऊन जनावरांच्या हालचाली अतिशय मंदावतात. त्यांना चालणे वेदनादायक होते.

मेट्रो प्रकल्पातील त्रुटी दूर करू


वनाज ते रामवाडी आणि चिंचवड ते स्वारगेटदरम्यानच्या मेट्रो मार्गास राज्य सरकारने मान्यता देऊन केंद्र सरकारकडे अहवाल पाठविला आहे. केंद्र सरकारनेही या दोन्ही मार्गांस तत्त्वत: मंजुरी ... निगडी ते कात्रज हा सर्वाधिक गर्दीचा मार्ग का निवडला नाही, या व अशा अनेक ...

खासदार बारणे बसणार महापालिका सभागृहातही!

निशा पाटील
शिवसेनेचे सहसंपकप्रमुख श्रीरंग बारणे यांनी नगरसेवकपदावरुन थेट खासदारपदावर झेप घेतली आहे. मात्र, स्थानिक प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठविता यावा यासाठी बारणे आपले नगरसेवकपद कायम ठेवणार आहेत. ते संसदेत खासदार तर महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून बसणार आहेत. त्यांच्या या दुहेरी भुमिकेमुळे महापालिका सभागृहाला आगळा-वेगळा अनुभव मिळणार आहे.

लक्ष्मण जगताप यांचा पराभव अन् पिंपरीच्या राजकारणातील ‘सूडचक्र’

बहुचर्चित लढतीत बारणेंच्या बाणातून जगतापांचा ‘वेध’ घेत एक सूडचक्र पूर्ण झाले.

नगरसेवक ते थेट खासदार !

थेरगावमधील एका शेतक-याचा मुलगा, सलग तीन वर्षे नगरसेवक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर थेट मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार असा श्रीरंग बारणे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

राष्ट्रवादी, आपसह मावळात 17 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर, आपचे मारुती भापकर यांच्यासह 17 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. तर शिवसेनेचे मताधिक्य तब्बल दीड लाखाने वाढले तर राष्ट्रवादीचे एक लाखाने घटले आहे. 

पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

नरेंद्र मोदींच्या लाटेने देशाची सत्ता भाजपला मिळाली. आतापर्यंत मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या उद्योगनगरीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे कमालीचा उत्साह संचारला आहे.