Sunday 1 June 2014

पुणे-बेंगळुरू महामार्गाचे काम आठ दिवसांत पूर्ण करा

पुणे-बेंगळुरु महामार्गावर सुरू असणारे रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. येत्या आठ दिवसांमध्ये हा प्रश्न सुटला नाही तीव्र आंदोलन करून हा ‘रस्ता बंद’ करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी दिला आहे.

पिंपरीतील नव्या २० गावांच्या समावेशाचा प्रस्ताव अधांतरी

चहुबाजूने तीव्र विरोध असल्याने पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मात्र ‘अधांतरी’च आहे.

एलबीटी विरोधात व्यापा-यांचा असहकार आंदोलन

व्यापा-यांवर लादला जाणारा एलबीटी कर रद्द करून व्हॅटवर सरचार्ज लावावा, या मागणीचा निर्णय महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्याकडून कमिटीकडून लांबणीवर टाकला जात आहे. यामुळे व्यापा-यात सरकार विरूद्ध असंतोष पसरला असून एलबीटी विरोधात असहकार आंदोलन करणार असल्याचा इशारा फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड या व्यापारी संघटनेने प्रसिद्धपत्रकाव्दारे दिला आहे.