Friday 17 November 2017

संपादित क्षेत्रावरील भूखंडाची किंमतही वसूल करणार

पीसीएनटीडीएचा निर्णय : अनधिकृत बांधकाम नियमितीकरण
पिंपरी – भूखंडाचा चालू बाजारभाव आणि अवैध बांधकाम नियमितीकरण दंड आकारून पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हद्दीतील बांधकामे नियमित केली जाणार आहे. त्यासाठी आकुर्डीतील पीसीएनटीडीए कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारपासून नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संपादित क्षेत्रावरील बांधकामे नियमितीकरणासाठी भूखंडाची किंमतही बांधकामधारकाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment