Thursday 9 March 2017

पिंपरीत महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे

राष्ट्रवादीकडून शाम लांडे, निकिता कदम यांनी भरले अर्ज 


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांनी तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले असल्यामुळे या दोघांची निवड निश्चित आहे. तर, राष्ट्रवादीकडून शाम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी  अर्ज दाखल केले आहेत. 

Meeting on illegal godowns soon

PIMPRI CHINCHWAD: In a bid to decide on removing unauthorized scrap godowns and shops in Kudalwadi area of Chikhli, the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) will hold a meeting of the newly elected corporators of various political parties.

BJP leader urges CM to cancel PCMC-approved works

Among the new works include hospitals at Akurdi and Thergaon, a grade separator and a flyover at Bhakti Shakti chowk on Mumbai Pune highway at Nigdi, new projects, and road beautification. There has been no study or detailed project reports of the ...

PCMC hiring Doctors & Paramedical Staff

Click title to see official circular published by PCMC

महापालिकेचे 255 गाळे रिक्‍तच

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 255 गाळ्यांना ग्राहक मिळत नसल्याने रिक्‍त आहेत. तर दुसरीकडे आजी-माजी नगरसेवकांनी नातेवाइकांच्या नावे महापालिकेशी अनेक वर्षाचा भाडेपट्टा करार करून मोक्‍याच्या जागा नाममात्र दरात बळकावल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर महापालिकेला पाणी सोडावे लागत आहे. 

मेट्रो प्रकल्पाच्या कामांना वेग?

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गिके दरम्यानचा हा टप्पा आहे. या कामासाठी निविदापूर्व बैठकीचे आयोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते. मेट्रोच्या कामाबाबची सविस्तर चर्चा आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन या ...

Godman nabbed for extorting money from Pimpri trader

Pimpri police arrested a 45-year-old man from Transport Nagar in Nigdi for blackmailing and extorting money from a businessman by posing as a godman. The accused was caught redhanded while accepting Rs 4,000 from the complainant. Earlier, the ...

आज ठरणार महापौर

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे महापौर निवडण्यासाठी मुंबईत बुधवारी बोलावलेली बैठक आता गुरुवारी (ता. ९) होणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक नागपूरला रवाना झाल्याने बुधवारची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौरपदाच्या शर्यतीत शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे यांच्याबरोबर आता शीतल शिंदे, संदीप वाघेरे यांचीही नावे चर्चेत आल्याने उत्सुकता आणखी ताणली असून, चुरस वाढली आहे.

अवतरलाय इंटरनेट युगाचा "रावण'

पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्‌सऍप, फेसबुक हे "स्टेट्‌स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्‌सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपने पारदर्शी कारभाराची हमी दिली आहे. मात्र, भाजपकडून कामकाजात होणाऱ्या चुका प्रभावीपणे मांडण्यासाठी किंवा होणारा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी अभ्यासू व फर्डा वक्‍ता असलेले योगेश बहल यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्‍तांकडे नोंदणीही करण्यात आली आहे. त्यामुळे बहल हेच विरोधी पक्षनेता होणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक तरुण अन् शिक्षित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या सभागृहातील नगरसेवकांचे सरासरी वय 46 असून तुलनेने हे सभागृह तरुण आहे. पुन्हा निवडून आलेल्यांचा अपवाद वगळता प्रथमच निवडून आलेले बहुतांश नगरसेवक तरुण आहेत. सर्वांत लहान वयाच्या नगरसेवकपदाचा मान मान रावेत-किवळे प्रभागातून (16 ब) निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर यांना मिळाला आहे.

'स्वाइन फ्लू'च्या सर्वेक्षणाचे आदेश

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाइन फ्लू'चा संसर्ग वाढत असल्याने या दोन्ही शहरांतील संशयित पेशंटचे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने अधिकाऱ्यांना दिले. त्याशिवाय संशयित पेशंटना वर्गवारीनुसार ...

शासनाकडून न्यायसंकुलाची प्रतीक्षा

पिंपरी : शाळेसाठी महापालिकेने बांधलेल्या इमारतीत पिंपरी, मोरवाडी येथे भाडेपट्ट्याने उपलब्ध झालेल्या जागेत २७ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज चालते आहे. १९८९ ते अद्यापपर्यंत पक्षकारांची आणि ... सुरू होण्यासाठी बराच कालावधी जाणार ...