Thursday 11 May 2017

Buoyed by rainwater harvesting success, society to spread word


Over 3,000 citizens in the 32-building complex of Roseland Residency in Pimple Saudagar have set a precedent by the exemplary implementation of rainwater harvesting.

Thanks to this practice, the society hasn't had to call a single water tanker since 2009. The residents of the 1,000 odd flats in the society have been harvesting rainwater diligently since then for groundwater augmentation. On May 13, Santosh Maskar, chairman of the society , will present a case study of their victory over water scarcity at an awareness programme -`Everything abo ut Rainwater Harvesting' -organized by the Pimpri Chinchwad Citizen Forum (PCCF) in association with the Pimpri Chinchwad Municipal Corporation.


Twin towns' locals can't access new CFC office, at Akurdi

Pimpri-Chinchwad's main citizen facilitation centre (CFC) office has been shifted from the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) building to an establishment in Akurdi, much to the woes of the locals, who found it easier to access the PCMC ...

‘ओव्हरलॅप’ वगळून रिंगरोड कायम ठेवा

दोन्ही रिंगरोडबाबत समितीचा पर्याय
पीएमआरडीएचा रिंगरोड सुमारे १२८ किलो मीटर
एमएसआरडीसीचा रिंगरोड सुमारे १७० किलो मीटर
पुणे - पीएमआरडीए व एमएसआरडीसीचा रिंगरोड ओव्हरलॅप होणाऱ्या गावातील एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळून उर्वरित रिंगरोड कायम ठेवावा, असा पर्याय राज्य सरकार नियुक्त समितीकडून मांडण्यात आला आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तसे झाल्यास जिल्हा दोन रिंगरोड होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

“नमानी गंगे’ अंतर्गत इंद्रायणीचे पुर्नरुजीवन

पुणे – केंद्र सरकारच्या “नमानी गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदी पुर्नजीवन करण्यात येणार आहे. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर इंद्रायणी नदीच्या पुर्नरुजीवनासाठी निधी मिळणार असून प्रदुषणमुक्त नदी होण्यास मदत होणार आहे.

चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रोजेक्‍ट गुंडाळला

यमुनानगरला लागते २० लाख लिटर जादा पाणी
पिंपरी - महापालिकेने यमुनानगरमध्ये राबविलेला २४ तास पाणीपुरठ्याचा पायलट प्रोजेक्‍ट गुंडाळला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यमुनानगरला दोन दशलक्ष लिटर जादा पाणी लागत असून महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी दिलेले २४ तास पाणीपुरवठ्याबाबतचे आश्‍वासनही हवेतच विरले आहे. 

महापालिकेकडून आळंदीला दररोज २ लाख लिटर पाणी - महेश लांडगे

पिंपरी -  पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.

बोपोडी चौकातील “सिग्नल बंद’ योजना तासाभरातच फसली

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जटील : वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाला अपयश
दापोडी, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दूर करण्याकरिता वाहतूक पोलीस विभागाने बुधवारी (दि. 10) दुपारी बोपोडी चौकात “विना सिग्नल’ (सिग्नल बंद) योजना तासाभरात गुंडाळण्यात आली. चौकातील स्टॉल, टपऱ्यांमुळे पुणे महानगर परिवहन (पीएमपी) बससह जड वाहने चौकातून वळवण्यास अडचणीचे ठरले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या “प्रयोग’ ला पुढील काही काळ खीळ बसली आहे.

गरवारे वॉल रोप्सच्या कामगारांचे दिघीत श्रमदान

पिंपरी, (प्रतिनिधी) – गरवारे वॉल रोप्स कामगार संघटना आणि पुण्यातील निसर्ग प्रेमी ग्रुपच्या वतीने दिघीतील दत्तगड येथे “पाणी आडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविण्यात आला.

खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

लंडनमधील कंपनीचा महापालिकेकडे प्रस्ताव; अधिकाऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर
पिंपरी - अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजविणाऱ्या ‘इन्फ्रारेड रिसायकलिंग रोड पॅचिंग’ उपकरणाचे प्रात्यक्षिक शहर अभियंता अंबादास चव्हाण व महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ९) पाहिले. लंडनमधील ‘नू फाल्ट’ कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, पुण्यातील ‘काम अविडा’ कंपनीमार्फत त्याचे मार्केटिंग सुरू आहे. 

वल्लभनगर आगारातून पाच शहरांसाठी जादा बस

निगडी - एसटीच्या वल्लभनगर आगारातून सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर
पाच शहरांसाठी आठ जादा गाड्या पंधरा जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. वल्लभनगर आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी याबाबत माहिती दिली. 

कामगाराच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना

पिंपरी, (प्रतिनिधी) – टाटा मोटर्स कंपनीच्या व्हीआयपी कॅन्टीनजवळ लागलेली आग एका कामगाराच्या प्रसंगावधानामुळे वेळीच आटोक्‍यात आली. त्यामुळे मोठी दुघर्टना टळली.
प्रशांत पांडूरंग पिसे असे या कामगाराचे नाव आहे. टाटा मोटर्स कंपनीत पहिली शिफ्ट संपत असतानाच व्हीआयपी कॅन्टीनच्या खालील जीन्यात शॉर्टसर्कीट झाले. त्यातून धूर, वास येत असल्याचे प्रशांत पिसे यांच्या लक्षात आले. आग इतक्‍या जलद पसरली की, तेथील पंथा पूर्ण वितळून त्याच्यातून पेटलेल्या थेंबाचे ठिपके पडू लागले. ही आग पसरत गेली तर, कंपनीची मोठी जिवित अथवा मालमत्तेची हानी होणार होती.

UK citizen revamps Pimpri school as birthday gift to himself