Friday 23 June 2017

पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश

नवी दिल्ली, दि. 23- केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड या शहराला स्मार्ट सिटीच्या चौथ्या ...

अमरावती, पिंपरी-चिंचवडही होणार 'स्मार्ट'

केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची तिसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशभरातील ३० ...

स्मार्ट शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड, अमरावतीचा समावेश

देशातील १०० स्मार्ट शहरे वसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं स्मार्ट शहर योजना हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्र सरकार आता ३० शहरांचा विकास करणार आहे. या शहरांच्या नावांची घोषणा नगरविकास मंत्री ...

PCMC approves formation of SPV for smart projects

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved the formation of the special purpose vehicle (SPV) for the Smart Cities Mission projects. The SPV would be headed by urban development department principal secretary Nitin ...

Chinchwad women stir to save homes from PCNTDA's dozer

The the Pimpri-Chinchwad New Town Development Authority (PCNTDA) has proposed to demolish around 800 properties in the Bijalinagar locality of Chinchwad to make way for a ring road project that would link Pune and Pimpri-Chinchwad and hopefully ease ...

PCMC to provide free life skills training to tribal, underprivileged women

The decision was approved by the Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) standing committee under the Pramod Mahajan Kaushalya Vikas Yojana. Under the scheme, women will be provided training in patient care, housing, hospitality ...

महापालिका देणार सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचे प्रशिक्षण

स्थायी समितीचा निर्णय : पारंपारिक प्रशिक्षणाला मिळणार फाटा
पिंपरी, (प्रतिनिधी) – महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता महापालिकेच्या पारंपारिक प्रशिक्षणाला फाटा देवून नवनवीन उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य विकासांतर्गत तासिका तत्वावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

[Video] अन पुन्हा ग्रेडसेपरेटरमध्ये उंच गाड्या अडकल्या


पिंपरी-चिंचवड येथील ग्रेड सेपरेटरमध्ये मोठ्या वाहनांना बंदी असताना देखील वारंवार टेम्पो, ट्रक यासारख्या मोठ्या गाड्या घुसतात व त्या पुढे पिंपरी चौकात किंवा चिंचवड चौकात पुलाखाली अडकतात. ही घटना पिंपरी-चिंचवडकरांना तशी नवी नाही कारण महिनाभराच्या फरकाने अशा घटना होतातच. तसेच आजही (बुधवारी) घडले. आज तर चक्क सहा बोअरवेलच्या गाड्या या ग्रेडसेपरेटमध्ये घुसल्या यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक थांबवावी लागली. 

[Video] पिंपरी पालिकेतील नगरसेवकांच्या व्हिजीटींग कार्ड, लेटरहेडसाठी 15 लाख रूपये खर्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्ताधीश झालेल्या भाजपकडून पैशाची उधळपट्टी सुरू झाली आहे. पदाधिका-यांसाठी व्हिजींटीग कार्ड, लेटरहेड, शिफारस पत्र यावर तब्बल 15 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत. तीन ठेकेदारांकडून हे वेगवेगळे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमजबजावणीस प्राधिकरणाची मंजुरी

  • सात वर्षांत होणार दोन टप्प्यांचे काम
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता
मुंबई – हवेली, मावळ, मुळशी व खेड या चार तालुक्‍यांना जोडणारा पुण्याचा महत्वकांक्षी रिंगरोड प्रकल्प सुसाट होणार आहे. दोन टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमजबजावणीसाठी नगर रचना योजना राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मान्यता देण्यात आली.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुणे प्राधिकरणाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ निवासस्थानी झाली. रिंगरोडच्या वित्तीय आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले याला प्राधिकरण सभेने मान्यता दिली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

पीएमआरडीए करणार सर्वंकष वाहतूक आराखडा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी यापूर्वीच वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यामुळे, त्यांच्या आराखड्याचा संदर्भ घेत महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, परिवहन महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन ...

नगरसेवकांच्या ड्रेसकोडची विरोधकांकडून खिल्ली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकांना ड्रेसकोड आणि अधिकाऱ्यांना ब्लेझर देण्याचा विषय नुकताच मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्‍वभुमिवर विरोधकांकडून सत्ताधारी भाजपची खिल्ली उडवली जात आहे.
भाजपकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी आणि कामाचा पोरखेळ सुरु असल्याची टीका विरोधक करत आहेत. माजी पालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अधिकाऱ्यांना ड्रेसकोड अनिवार्य केला होता. मात्र त्यांच्यात निर्णय राबवण्याची धमक होती. नंतरच्या आयुक्तांमुळे या निर्णयाची ऐसीतैसी झाल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.