Wednesday 26 July 2017

निवडणूक खर्च लपवला; “ते’ 99 उमेदवार “अपात्र’?

विभागीय आयुक्‍तांचा दणका ः नोटीसद्वारे हिशोब देण्याचा आदेश
पिंपरी, प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या 99 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. त्या उमेदवारांना विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी नोटीस बजावून खुलासा मागितला होता. परंतु, अनेकांनी आपला खुलासा सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

दोन दिवसांत सुरु होणार आधार नोंदणी

पुणे -जिल्ह्यात येत्या दोन दिवसात 200 केंद्रांवर आधार नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेली आधार नोंदणी आता पुन्हा सुरू होणार आहे.
शासनाने विविध योजनांसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक विवरणपत्रे भरण्यासाठी आधार कार्ड आवश्‍यक आहे. त्यासाठीची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. मात्र आधार कार्ड नोंदणी न केल्यामुळे, अथवा आधार कार्डात झालेल्या चुकांमुळे अनेकांना आर्थिक विवरणपत्रे भरण्यास अडचणी येत आहेत. आधार कार्डातील दुरुस्ती आणि नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी शहरातील केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भरच पडली होती.

पदोन्नती समितीची अखेर बैठक?

आयुक्‍तांना मिळाला वेळ ः सहाय्यक आयुक्‍तांसह अन्य पदांची पदोन्नती
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्‍तांसह आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाबाबत पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी (दि.28) आयुक्‍तांच्या कक्षात आयोजित केली असून, त्यामुळे मनोज लोणकर, संदीप खोत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची “डीपीसी’ घेतली आहे. मात्र, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगवीमध्ये अवैध दारुचा साठा जप्त; दोघांना अटक

पिंपरी – बेकायदा दारु विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन हॉटेलवर छापा टाकला. सुमारे पाच हजारांच्या 44 बाटल्या हस्तगत केल्या असून, दोघांना अटक केली आहे. नवी सांगवीतील समर रेस्टॉरंट आणि एकाच्या घरातून साठा जप्त केला आहे.

PCMC proposes to generate biogas from hotel waste

According to the proposal, the PCMC will give Rs 1,125 for per tonne of waste collected from hotels to a respective firm that will be generating biogas. It has also promised five per cent extension every year for the period of 20 years. The civic body ...

“ऑनलाइन’ कर भरण्यात “आयटीयन्स’ आघाडीवर

कर संकलन विभाग : साडेतीन महिन्यात 47 हजार जणांनी घेतला लाभ
पिंपरी – महापालिकेने सात वर्षापूर्वी सुरू केलेल्या ऑनलाईन मालमत्ता कर भरणा सुविधेला आता वेग आला आहे. घर बसल्या एका क्‍लिकवर कर भरणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात अवघ्या साडेतीन महिन्यात तब्बल 47 हजार 247 नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला आहे. त्यामध्ये आयटी नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामांना यापुढे संरक्षण नको

अशा विचारसरणीमुळेच, जे रेड झोनच्या (संरक्षित क्षेत्र) प्रश्नांचे झाले, तेच अनधिकृत बांधकामांविषयी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास दोन लाख अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्याचे पालूपद कितीतरी वर्षांपासून सुरू ...

चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

पिंपरी-चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर बंधूनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने लवकरच डाक तिकीट तयार होणार आहे. तिकीट अनावरणासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, अशी त्यांनी विनंती ...

विज्ञान केंद्रात मिग २३ विमान

पिंपरी - बहुप्रतीक्षित असे भारतीय हवाई दलातील ‘मिग २३’ हे लढाऊ विमान पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. २५) दाखल झाले. त्याच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विमानामुळे पिंपरी- चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

घरात "फिश टॅंक' ठेवताय...जरा सांभाळून

पुणे - रंगीबेरंगी मासे पाळणे, हे काही वर्षांपूर्वी श्रीमंतीचे प्रतीक मानले जायचे. आता मात्र "इंटेरियर डिझायनिंग'च्या जमान्यात अनेकांच्या घराला "फिश टॅंक किंवा फिश पॉट'मुळे जिवंतपणा आल्याचे पाहायला मिळते. साधारणपणे लायन फिश, बटरफ्लाय फिश, एंजल फिश हे मासे खरंतर अनेकांच्या घराची शोभा वाढवितात. परंतु जरा सांभाळून हं! आगामी काळात घरात हे शोभिवंत मासे पाळणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे तितकेसे सोपे राहणार नाही. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने शोभिवंत मासे विक्री-खरेदी संदर्भातील नियमावली कडक केली असून, अनेक माशांच्या विक्रीवर आणि घरात ठेवण्यावर बंदी आणली आहे.