Saturday 2 September 2017

Cop files plaint against PCMC addl commissioner for abuse

When an angry mob was crying foul at Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) additional commissioner Aychut Hange, and blaming the corporation's carelessness for the loss of a life, Hange was miffed at the cop on duty there and let loose a ...

Bapat late for PCMC fest inauguration

Guardian minister Girish Bapat arrived two-and-a-half-hour late for the inauguration of the Pimpri Chinchwad Festival 2017 keeping actress Sonali Kulkarni, local BJP leaders and audience waiting. Expressing his regret for coming late, Bapat said, "I ...

NH4 widening plan stalled with 250 trees facing the axe

The four kilometre stretch along the highway, which is currently being widened between Nigdi and Dehu Road, has hit several roadblocks as the government bodies did not submit any plan for replanting the trees.

वायसीएम रुग्णालय पडलेय आजारी; पाहणी करून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला डोस

एकनाथ पवार ; आम्हाला खरेदीत रस नाही. शहरातील गोरगरिबांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे
वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीयअधिकारी, कर्मचार्‍यांच्या रिक्तपदाअभावी दैनंदिन रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याने तसेच डॉक्टर, परिचारकांची कमतरता, औषधांचा तुटवडा, पायाभूत सुविधांची कमतरता या मुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आजारी पडले असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील गंभीर समस्या पुन्हा एखदा उजेड्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांसह शुक्रवारी (दि. १) महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची तीन तास पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे रुग्णालयातील समस्यांवरून प्रशासनाला धारेवरही धरले. शहराची ओळख असलेले वायसीएम रुग्णालय सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सत्तारूढ पक्षनेते यांनी रुग्णालयातील अनागोंधी कारभाराबाबत त्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या – संभाजी ऐवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घेवून स्वत:चा समाजिक व आर्थिक विकास करावा, असे मत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले.

‘स्थायी’च्या निर्णयावर नव्या बसचे भवितव्य

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन्ही स्थायी समित्यांनी वेळेत ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तर दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात २०० बस दाखल होण्यास महिनाअखेरीस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ बस तयार झाल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पार पडली, तर पंधरा दिवसांनंतर या बस मार्गांवर धावू शकतील. 

पालिकेच्या 39 प्राथमिक शाळा बंद

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने तब्बल 39 शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी घेतला. या विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका शाळेत जाण्यास सांगितले आहे. 

सांगवीत सहा गणेशोत्सव मंडळांवर होणार कारवाई

पिंपरी – विसर्जन मिरवणुकीत कायद्याने ठरवून दिलेल्या मयार्देपेक्षा अधिक मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम चालविल्यामुळे जुन्या सांगवीतील सहा मंडळांवर कारवाईची तलवार लटकत आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची तजवीज हाती घेतली आहे. उल्लेखनीय बाब अशी की या सहा मंडळांपैकी बहुतेक सर्व मंडळे ही जुनी आणि सांगवीतील प्रतिष्ठित मंडळे म्हणून ओळखली जातात. विशेषत: काही मंडळांना राजकीय पाठबळही मोठे आहे.

मराठी 'तारका'वरून फेस्टिव्हलमध्ये वाद

महापालिकेच्या वतीने या वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलची सुरुवात केली आहे. एका तपानंतर महापालिका हा महोत्सव आयोजित करीत आहे. त्यात रविवारी निर्माते निखिल निगडे, तेजश्री अडिगे यांचा महाराष्टÑाच्या सुवर्णतारका हा ...

प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली

पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल ...

शिवसेना नगरसेवकांना विश्‍वासात घ्या!

– शिवसेना उपनेत्या आमदार गोऱ्हे यांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेच्या कंपनी संचालकपद निवडीत शिवसेना गटनेत्यांना विश्‍वासात घेतले नाही. यावर शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलण्यास टाळले. परंतु, महानगरपालिका सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याबाबत महापालिकेने शिवसेना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नसल्याबद्दल आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे नाराजी व्यक्‍त केली.

12 खेळाडूंना 23 लाखांचा निधी

पिंपरी – शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने खेळाडू दत्तक योजना राबविली आहे. त्यानूसार 12 पात्र खेळाडूंना सुमारे 23 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, अन्य विविध विकास कामांना येणाऱ्या सुमारे 24 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

शिक्षण समितीचा निर्णय रद्द होणार?

न्यायप्रविष्ठ प्रकरण : निकाल अंतिम टप्प्यात
पिंपरी – शिक्षण मंडळ बरखास्तीच्या निर्णयाच्या विरोधात मंडळाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात असून मंडळाच्या बाजुने निकाल लागल्यास शिक्षण समिती नेमण्याचा शासनाचा निर्णय रद्द होण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार बरखास्त झालेल्या मंडळातून पायउतार झालेल्या सदस्यांना देखील शिक्षण मंडळाचे काम करण्याची संधी मिळणार आहे.

पालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांलगत मद्यविक्रीला परवानगी

उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचा अंतरिम आदेश
परवान्यांचे नूतनीकरण झालेल्यांना व्यवसाय सुरू करता येणार
नागपूर – राज्यात पालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांलगत मद्यविक्री करण्याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाने परवानगी दिली. हा अंतरिम आदेश 2017-18 या आर्थिक वर्षासाठी परवान्यांचे नूतनीकरण करून घेतलेल्या मद्यविक्री दुकानांना लागू होणार आहे. त्यामुळे परवान्यांचे नूतनीकरण झालेल्या मद्यविक्री दुकानांना व्यवसाय सुरू करता येणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी राज्य सरकार बाजू मांडणार आहे.

मोशीत गुडमॉर्निंग पथकाची धडक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असुनही उघड्यावर शौचालयाला जाणाऱ्या मोशी प्राधिकरण परिसरातील तीन नागरिकांवर आज गुरुवारी (दि. 31) दंडात्मक कारवाई करुन दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.