Tuesday 10 October 2017

#PrideOfPimpriChinchwad Sanket Bhondve receives award from President for schemes for elderly

Sanket Bhondve,The first from Pimpri-Chinchwad to get into IAS, received award from Hon'ble Prseident President of India for attempting to brighten the lives of thousands of elderly people of the district through various welfare programmes. The award titled ‘Integrated development of Ujjain zila panchayat and Nagada Municipality,’ was given at a ceremony held at Vigyan-Bhawan in New Delhi, on Monday (9th Oct).

पिंपरी-चिंचवड येथून पहिले आयएएस अधिकारी झालेले संकेत भोंडवे यांना उज्जैन येथील हजारो वृद्ध लोकांचे जीवन सुसह्य करण्याच्या कामगिरीसाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून नुकतेच सन्मानित करण्यात आले.


प्राधिकरणात साकारणार ‘मेट्रो इको पार्क’

पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड जसे श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते, तसे उद्यानांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराच्या सौंदर्यावर नेहमीच मराठी सिनेसृष्टी भाळलेली असते. आता उद्यानांच्या या माहेरघरात आणखी एका नैसर्गिक उद्यानाची भर पडत आहे. पुणे मेट्रोच्या उभारणीमध्ये जेवढी झाडे हटवावी लागणार आहेत, त्याहून अधिक नानाविध प्रकारची झाडे या उद्यानात पाहायला मिळणार आहेत. एखाद्या जंगलाप्रमाणे (फॉरेस्ट स्टेशन) या मेट्रो इको-पार्कची रचना असेल. हे उद्यान प्राणवायूचा स्रोत (ऑक्‍सिजन हब) म्हणूनही ओळखले जाईल.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे रूंदीकरण अडचणीत

जागेच्या मोबदल्यात लष्कराकडून 200 कोटींच्या कामाची मागणी
पुणे – महापालिका हददीतील जुन्या पुणे – मुंबई रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम अडचणीत सापडले आहे. या रस्त्यावरून मेट्रो तसेच बीआरटी मार्ग जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे गेली अनेक वर्षे रखडलेले रूंदीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेकडून खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या हद्दीतील खडकी परिसरातील सुमारे अडीच कि.मी. रस्त्याची जागा रुंदीकरणासाठी मागण्यात आली होती. मात्र, या जागेच्या मोबदल्यात लष्कराने एक उड्डाणपुल अथवा ग्रेड सेपरेटर आणि दोन भुयारी मार्ग अशी कामे करून देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. या कामांसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झालेली आहे.

अधिसूचनेनंतर अनधिकृत बांधकामधारकांसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष

राज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यावर कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांना अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठी सोमवारपासून (दि. ९) अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

PCMC to residents: Start applying for regularisation of illegal structures

AFTER the state government released the final rules for regularising illegal structures, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has urged residents to make an application, seeking legalisation of their illegal structures. The PCMC said it ...

PCMC’s Development Plan: Red, blue floodlines marked; 20,000 old structures to be redeveloped

The rules specify that redevelopment of the existing authorised properties within the river bank and blue floodline may be permitted at a height of 0.45 metres above the red floodline level subject to an NOC from the irrigation department.

Government’s Diwali bonanza: New norms pave the way for regularisation of illegal structures

State issues notification on final rules; Pimpri-Chinchwad 'biggest' beneficiary; compounding charges come under flak.

Industrial Training Institutes set to revamp old laboratories, Rs 100 crore sanctioned

बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातील वन्यजीव महोत्सवाचा उंदड प्रतिसाद

महापालिकेचे वतीने ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात आयोजित वन्यजीन महोत्सवाला विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने वन्यजीव प्राण्यांविषयी मार्गदर्शन, स्पर्धा आणि वृक्ष लागवड असे विविध उपक्रम राबविण्यात आहे.

ज्येष्ठांची वयोमर्यादा 60 करणार - राजकुमार बडोले

पुणे - ""ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे,'' अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिली. 

मोर्चानंतर राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम

पिंपरी - वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी शहरात जन हाहाकार मोर्चा काढला. त्या वेळी नागरिकांनी टाकलेला कचरा, लावलेले बॅनर आणि झेंडे मोर्चानंतर लगेच काढून घेतले. 

गुटखाबंदी फक्त कागदावर

पिंपरी - राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदीचा कायदा केलेला आहे, मात्र, ही बंदी नावालाच असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे.

शहरातील गुटख्याच्या खरेदी-विक्रीचे मोठे केंद्र पिंपरी आहे. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. पोलिस यंत्रणेचाही यात सहभाग असला तरी, तो त्या-त्या वेळचे गुन्हे दाखल करून घेण्यापुरताच दिसतो. त्यामुळे गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली आहे. शुद्ध पाणी मिळणार नाही, पण गुटखा मिळेल अशी अनेक दुकाने, पानटपऱ्या गल्लोगल्ली आहेत. बंदीचा निर्णय होण्यापूर्वी गुटखा उघडपणे डिस्प्लेकरून विकला जायचा, आता तो छुप्या पद्धतीने सर्रास विकला जात आहे. कोणत्याही पानटपरीवर गुटख्याचा कोणताही ब्रॅण्ड मागितला, तर टपरीचालक पुडी कुठून काढतो हे लक्षात येण्याआधीच ग्राहकाच्या हातात गुटख्याची पुडी ठेवलेली दिसते. 

रिक्षा, काळी-पिवळी, वेब टॅक्‍सींचा दर ठरणार

खटुआ समितीचा अहवाल सादर
मुंबई – रिक्षा, काळी-पिवळी टॅक्‍सी तसेच वेब आधारित टॅक्‍सींचे भाडेनिश्‍चिती आता लवकरच ठरणार आहे. हे नव्याने दर निश्‍चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत नेमण्यात आलेल्या खटुआ समितीने आपला अहवाल आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालाचा अभयास करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.

अनधिकृतच्या प्रश्नासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावली – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील सुमारे २० लाख कुटूंबियांच्या घरावर कारवाईची टांगती तलवार होती. हा प्रश्न सुटावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आघाडी सरकारच्या काळात मी या प्रश्नासाठी अपक्ष आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी माझ्यावर अनेक आरोप झाले होते. मात्र मी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रश्नासाठी माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावली असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बोलताना सांगितले.

कुठे नेऊन ठेवलीत भ्रष्टाचाराची प्रकरणे?

पिंपरी – महापालिका निवडणुकीआधी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक प्रकरणात भ्रष्टाचार केल्याने भाजपने महामोर्चा काढला, भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये हवा खाण्यास पाठवायचा बंदोबस्त केला, याबाबत अनेक प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून चौकशीचे आदेशही दिले. यामुळे सत्ता परिवर्तन होवून भाजपच्या हाती शहरवासियांनी सूत्रे दिली. मात्र, गेल्या सात महिन्यात भाजप पदाधिकारी आता पारदर्शकतेबाबत मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे “कुठे नेऊन ठेवलीत भ्रष्टाचाराची प्रकरणे’, असा सवाल पिंपरी-चिंचवडकर करत आहेत.

मोशी उपबाजारात पालेभाज्यांची आवक दुपटीने वाढली

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 667 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 10 हजार 40 गड्डया एवढी झाली आहे. दसऱ्यानंतर आलेल्या रविवारी भाजीपाल्याची आवक केवळ दोन क्विंटलने घटली. तर पालेभाज्यांची आवक पाच हजार 45 गड्डयांनी वाढली आहे. कांद्याची आवक 24 क्विंटलने वाढली असून, बटाट्याची आवक विक्रमी 220 क्विंटल घटली आहे. सरासरी भाव मात्र स्थिर राहिले.