Saturday 14 October 2017

पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली स्वीडनच्या काऊंसिल जनरल कॅम्पबेल वेल्टलिंड यांच्या शिष्टमंडळाने भेट

स्वीडनचे काऊंसिल जनरल जॉन कॅम्पबेल वेल्टलिंड यांनी शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस भेट दिली.
शहराचे महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हार्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सँडविक एशिया कंपनीचे एच.आर. सहर्ष डेव्हिड, अधिकारी निळकंठ पोमण, उपअभियंता सुनील पवार या वेळी उपस्थित होते.

‘वेस्ट टू एनर्जी’ला खासदार आढळरावांची विरोधाची भुमिका

मोशी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबिवण्याबाबत शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधाची भूमिका मांडली आहे. प्रकल्पाच्या निमित्ताने शहराचा कचरा पुन्हा मोशीत आणण्याचा प्रयत्न असल्याने त्याला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले ला जाणार आहे. त्याला आपला विरोध असून मोशी, भोसरीकरांना अधिक त्रास सहन करावा लागणार असल्याची भूमिका आढळरावांनी मांडली आहे.

मनसेने फेकला पालिका भवनापुढे कचरा; महापालिका प्रशासनाचा केला निषेध

पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १३) महापालिकेसमोर ‘कचरा फेको’ आंदोलन केले. आंदोलनात थेट “आयुक्तांचे करायचे काय, खाली डोके  वर पाय” अशा घोषणा देत निषेध करण्यात आला.

New water pipeline from Nigdi to Akurdi

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will lay a new water pipeline from Nigdi to Akurdi as a part of its long-term solution for inadequate and low-pressure water supply problems here. The civic body will also undertake a ...

विशाल नगरचा डीपी रस्ता “स्मार्ट वॉर्डा’ त समाविष्ट करा

पिंपरी – महापालिकेच्या हद्दीलगत प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर ते बाणेर पुलासह 24 मीटरचा नदीच्या पलीकडील डीपी रस्ता पुणे महापालिकेच्या स्मार्ट वॉर्डात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी या भागाला लागून असलेला पिंपळे निलख येथील डीपी रस्ता देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

निळू फुलें सारखा सच्चा मनाचा माणूस पुन्हा होणे नाही – अशोक सराफ

पिंपरी (प्रतिनिधी):- निळू फुले यांनी अभिनयाच्या क्षेत्रातील ठराविक चाकोरीच्या बाहेर जाऊन आपला अभिनय सादर केला. त्यांनी खर्डा आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राला धरून ठेवलं. निळू फुलेंनी सहकलाकारांना कधीच खालची वागणूक दिली नाही. त्यांच्या सारखा सच्चा मनाचा असा माणूस पुन्हा होणे नाही असे परखड मत जेष्ठ मराठी सिने अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

पुणे - पीएमपीच्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के बोनस आणि 12 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने शुक्रवारी घेतला. त्यासाठी पुणे महापालिका 19 कोटी 26 लाख तर पिंपरी चिंचवड महापालिका 12 कोटी 84 लाख रुपये अनुदान देणार आहे. 

आम्ही अजूनही सिग्नललाच आहोत...

पिंपरी - तुरुंगातून जामिनावर सुटलेला विजय मल्ल्या घरी पोचलादेखील... मात्र, आम्ही अजूनही हिंजवडीमध्ये सिग्नललाच आहोत..., अशी हिंजवडीत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शोकांतिका मांडणारा विनोद सध्या सोशल साइटवरून वेगाने फिरतोय. तसेच, रोज रात्री घरी येणारे ते दोघे कोण? या नातीच्या भाबड्या प्रश्‍नाला हिंजवडीत काम करणारे ते तुझे आई-बाबा आहेत, असे उत्तर देणाऱ्या आजीचा विनोदही सर्वांनाच भावतोय. आतापर्यंत संपूर्ण जगभरात आदराचे स्थान असणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांवर होणारे हे विनोद अंतर्मुख करायला लावणारे आहेत. त्यात आणखी भर पडण्यापूर्वी शासनाने जागे व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे.

श्रवणीय गाणी ऐकण्याची भोसरीकरांना उद्या संधी

पिंपरी - "सकाळ माध्यम समूह' व योगेश गवळी यूथ फाउंडेशनच्या वतीने दिवाळीपूर्व पहाटनिमित्त "महाराष्ट्राची सणयात्रा' हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये "सारेगम'फेम प्रथमेश लघाटे, सई टेंभेकर, चैतन्य कुलकर्णी, योगिता गोडबोले या प्रसिद्ध गायकांच्या स्वरात श्रवणीय गाणी ऐकण्याची संधी मिळणार आहे. 

निगडीतील शाळेत हुक्का पिणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे निलंबन

पिंपरी (प्रतिनिधी):- हुक्का पिण्यासाठी आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वर्गाचाच वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार निगडीतील यमुनानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित शाळेने दोन विद्यार्थ्यांचे निलंबन केले आहे. सध्या शाळेत सहामाही परीक्षा सुरू असून, बुधवारी (दि. ११) पेपर झाल्यानंतर वर्गातच हुक्का पिणे सुरू असल्याचे उघड झाल्यावर शिक्षक हादरून गेले आहेत.

तुमचे फटाके प्राणी, पक्षांच्या जीवावर तर उठत नाही ना?

फटाकेविरहित दिवाळी साजरी करा : वनविभाग आणि अग्निशामक दलाचे आवाहन
पुणे, दि.11 – शाळांमध्ये “फटाकेमुक्‍त दिवाळी’च्या कितीही शपथा घेतल्या, तरीही अनेक विद्यार्थी फटाके आणतात आणि पालकही त्यांना ते पुरवतात. मात्र, तुमचे हे फटाके अनेक प्राणी व पक्षांच्या जीवावर उठत तर नाही ना? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन वनविभाग व अग्निशामक दलाने यंदाही केले आहे.

“फ्लाईंग लॅटर्न’ उडविणाऱ्यांवर फौजदारी

पिंपरी – आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पुणे व मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने राज्यभरात ही बंदी कायम केली असून, आकाश कंदील उडविण्याबरोबरच विक्री व साठा करण्यावर बंदी घातली आहे. आकाशात दिवे उडविल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केरसुणीतून “विणला’ संसाराचा रहाटगाडा!

पिंपरी – चार बाय चार जागेत.. दिवाळीसाठी केरसुण्या बनवायला जुंपलेले हात… वय वर्ष 70… हाताला केरसुण्या बांधूनच गठ्ठे पडलेले.. दिवाळीच लक्ष्मीपूजन म्हणजेच छोट्याशा शेडमध्ये लक्ष्मीमातेची पूजा करून तिथंच शिंदडामध्ये थाटलेला सणासुदीतला व्यवसाय..तीच त्यांची लक्ष्मी.