Thursday 19 October 2017

शासन प्रकल्पांसाठी राष्ट्रीय सल्लागारांची मदत

पिंपरी – शहरात महापालिकेने राज्य व केंद्र सरकारच्या अभियान विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे, याकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस हे नवीन लेखाशिर्ष निर्माण केला असून 3 वर्षांत 14 कोटी 31 लाख रूपये खर्च होणार आहेत. या विषयाला उपसूचनेसह मान्यता देण्यात आली.

PCMC okays proposal for property tax concession

Pimpri Chinchwad: Citizens in Pimpri Chinchwad, who have property tax arrears, will get a concession of 75% if it is cleared by October 31. Recommended By Colombia. If the tax is paid by November 30, citizens will get a concession of 50%. Tax ...

मेट्रो बांधकामाला परवानगीतून सूट

मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामांचा जलदगतीने विकास होण्यासाठी विकास परवानगीमधून वगळण्याची तरतूद बृहन्मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) करण्यात आली असून, आता अशीच तरतूद पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ...

रुग्णालयात मिळणार अपंगत्वाचा दाखला, वायसीएमएच, तालेरात सुविधा, राज्य शासनाने दिले महापालिकेला अधिकार

पिंपरी : अपंगांचे असलेले प्रमाण आणि त्या तुलनेत त्यांना अपंगत्वाचा दाखला देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका रुग्णालयांनाही अपंगत्व दाखला ...

रिंगरोडसाठी १३ हजार कोटी?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीलगत पीएमआरडीएतर्फे १२८ किमीचा रिंगरोड विकसित केला जाणार आहे. ... पीएमआरडीएतर्फे सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प विकसित केला जाणार आहे.

गुरूकुलमच्या विद्यार्थ्यांना आमदार महेश लांडगे यांची दिवाळी भेट; ‘डब्ल्यूटीई’ कंपनीचा विधायक उपक्रम

पिंपरी (प्रतिनिधी):- दिपावळीनिमित्त सामाजिक जाणिवेतून आमदार महेश लांडगे आणि ‘डब्ल्यूटीई’ सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील मुलांना चादर वाटप करण्यात आले.
चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने २००६ मध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दिपावळीनिमित्त चादर वाटप उपक्रमाचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, ‘डब्ल्यूटीई’ इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे संचालक प्रसाद कुलकर्णी, गुरुप्रसाद टेलकर, प्रियांका आवटे, सचिन फोंडके आदी उपस्थित होते.

यमुनानगरवासियांना मिळाली संगीत मेजवानी

निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुल व दीपोत्सव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात यमुनानगरवासियांनी संगीत मेजवानीचा मनमुराद आनंद घेतला. संदीप पाटील प्रस्तुत “उठा उठा पहाट झाली’ या मराठी हिंदी गाण्याचा अनोखा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ज्योतिबा फुले उद्यानाची दूरवस्था

पिंपरी – पालिकेच्या दुर्लक्षामुळे ज्योतिबा फुले उद्यानाची दूरवस्था झाली असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना या उद्यानात फिरायला जाण्याची इच्छा होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्यानाची दुरुस्ती करून नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने केली आहे.