Friday 20 October 2017

Four-lane 'butterfly' bridge to link Chinchwadgaon to Wakad

Currently, the residents of Chinchwadgaon, Pimpri link road and surrounding areas have to use the narrow two-lane bridge near Moraya Gosavi temple bund to reach the Chinchwadstation-Dange chowk road. But this bridge is very narrow and barely one ...

“स्मार्ट सिटी’ कार्यालयासाठी ग्रंथालयावर घाला

पिंपरी – केंद्र शासनाच्या “स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहराचा पायाभूत विकास साधण्यासाठी नियोजित आराखड्यातील कामकाज हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेतील परवाना आणि कायदा विभागाचे गांधीनगर येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालयासाठी बांधलेल्या नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ग्रंथालय रद्द करण्याचा निर्णय घेऊन शहराच्या वाचन संस्कृतीवर घाला घालणार असल्याची टीका वाचनप्रेमींमधून होत आहे.

महापालिकेच्या इंधनावर कुठेही फिरा!

पिंपरी – स्वत:चे खासगी वाहन वापरणाऱ्या महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना वाहनांतून फिरण्याकरिता वाहन भत्ता निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार 10 लाखापेक्षा जादा किमतीचे वाहन वापरणाऱ्या महापौर आणि आयुक्तांना 67 हजार रूपये मिळणार आहेत. सहा लाख रूपये किमतीपर्यंतचे वाहन वापरणाऱ्या इतर पदाधिकारी आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना 40 हजार रूपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना 33 हजार रूपये प्रतिपूर्ती रक्कम दरमहा मिळणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

एसटीच्या संपामुळे सामान्यांची कोंडी

पिंपरी – विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय न घेतला गेल्याने सलग दुसऱ्या दिवशी (दि. 18) संप सुरु आहे. त्यामुळे वल्लभनगर आगारातून एकही बस बाहेर पडू शकली नाही. कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलीस व एसटी प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

व्हॉटस्अँप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन; स्नेहवनच्या चिमुकल्यांसोबत केली दिवाळी साजरी

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील काही मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविले आहे. व्हॉटस्अँपच्या माध्यमातून मित्र झालेल्या ग्रुपने मिठाई, फटाके, किराणा सामान तसेच रोख रक्कम जमा केली. त्यानंतर भोसरी येथील स्नेहवन मधील वंचित चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली.

दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड

पिंपरी – दिवाळी सण सुरू झाला आहे. नवीन कपडे, फराळाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सगळ्यांच्याच आयुष्यात हा उत्साह असतो असे नाही. त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपत साद सोशल फाउंडेशच्या वतीने अंध कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

कर्जरोखे उभारण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार

पिंपरी – पुणे महापालिकेने नुकतेच पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारले आहे. त्याच पध्दतीने पिंपरी-चिंचवड महापालिकाही भविष्यात कर्जरोखे उभारणार आहे. या कामासाठी येस बॅंकेची सल्लागार म्हणून नऊ महिन्यांसाठी नेमणूक करण्यात आली असून त्यांना केंद्र शासन वेतन करणार आहे. भविष्यात महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पासाठी आणि निधी उभारण्यास स्वयंपुर्ण होण्यासाठी केंद्राच्या अध्यादेशाने पाऊले उचलली आहेत.