Tuesday 7 November 2017

मंत्रिपद: एक फुल तीन माली

मंत्रिमंडळ विस्तार: पिंपरी-चिंचवडकरांची उत्सुकता शिगेला 

PCMC chief calls for new DP with focus on transport

Pimpri Chinchwad: If the city has to become more liveable and sustainable in the long run, the development plan needs an overhaul with transport at its heart, feels Municipal Commissioner Shravan Hardikar.

पाणीप्रश्नावर भर

पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पवना धरणाव्यतिरिक्त अन्य धरणांतून पाणी आणण्यावर भर देण्याचे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने पाणी आणण्याचे अडथळे तातडीने ... देहूमार्गे पाणी उचलल्यास ...

वृक्ष गणनेचा खर्च सात कोटी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका हद्दीतील जमिनीवरील सर्व वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. वृक्षांची सॅटेलाईटद्वारे गणना कामास 6 कोटी 46 लाख 83 हजार 814 रुपये खर्चास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 मान्यता दिली, मात्र अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष दाखवून या रकमेत 29 लाख 58 हजार 904 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे वृक्ष गणनेचा एकूण खर्च 6 कोटी 76 लाख 42 हजार 718 रुपये होणार आहे. हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड वर्तमान : कालचा गोंधळ बरा होता

पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या विश्‍वासाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात सत्तेचे दान टाकले. परंतु, त्यांना ते पेलवेनासे झाल्याचे चित्र आहे. अवघ्या सहा महिन्यातच भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे उडाले. कचरा, पाणी, आरोग्य प्रश्‍नाचे तीन तेरा झाले आहेत. नगरसेवकांचा कोणाला कोणाचा पायपोस नाही. अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरु आहे. मागील दाराने वाढीव खर्चाच्या उपसूचनांचा भडीमार, विरोधकांची मुस्कटदाबी सुरुच आहे. मेट्रोच्या कामाला झालेली सुरुवात वगळता शहरासाठी लाभदायी असे एकही विकास काम अद्याप दृष्टीक्षेपात नाही. हा सारा कारभार पाहता कालचाच गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

सर्वंकष आराखड्यातून मेट्रोचे मार्ग निश्‍चित

पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी "सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्‍चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर "पीएमआरडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्‍चित करण्यात येणार आहे. 

महामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

पिंपरी – भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्‍स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

पालिका बांधणार पवनेवर बंधारा

पिंपरी – पवना धरणातून थेट बंदिस्त जलवाहिनीचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनूसार पिंपरी महापालिका शिवणे, गहूंजे गावासाठी पवना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधून देणार आहे. याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पीएमपीच्या 1550 बस अन्‌ 2400 ब्रेकडाउन !

पुणे - पीएमपीच्या ताफ्यातील 2000 बसपैकी सुमारे 1550 बस दररोज मार्गांवर धावतात. मात्र, दरमहा ब्रेकडाउनच्या किमान 2400 घटना घडत आहेत. जुन्या बसची वाढत असलेली संख्या आणि वाहतूक कोंडी, यामुळेही ब्रेकडाउनची संख्या वाढत आहे. 

भाजपाची ‘प्रतिमा’ डागाळली; १० वर्षातील भांडार विभागाच्या कामकाजाची चौकशी करा…!

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीमुळे सत्ताधारी भाजपाची जनमानसातील ‘प्रतिमा’ डागाळत आहे. महापालिकेच्या भांडार विभागाच्या दहा वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्यात यावी;. या विभागातर्फे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया, खरेदी आणि प्रत्येक आर्थिक व्यवहाराचीही सखोल चौकशी करून यातील दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

“बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा

– प्राधिकरण हद्दीतील घरे अधिकृत करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा स्वभिमानीच्या समन्वयकांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सभापतिपदासाठी चुरस, वर्णी लागण्यासाठी नेत्यांना साकडे

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन शिक्षण समिती लवकरच स्थापन होणार आहे. या समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर नववर्षात शिक्षण समितीचे ...

मुलांकडून भीक मागण्यांचा धंदा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात बेवारस आणि भिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या चौकांत सिग्नलवर अनेक भिकारी किंवा व्यंगाचे सोंग घेऊन वस्तू विकणारी बहुतांश मुले दिसतात. त्यामुळे मुलांकडून भीक मागणे हा धंदा झाल्याने वाहन चालकांना त्यांचा त्रास होत आहे.