Tuesday 14 November 2017

पिंपरी-चिंचवड वर्तमान – खेळ कुणाला पाण्याचा कळला?

पुण्यासह पिंपरी-चिंचवडच्या पाणी उपशावर राज्य सरकारने मर्यादा आणली आहे. आधीच शहरातील विविध भागात सुरु असलेली पाणी टंचाईची बोंब त्यात उपसावर येणारी मर्यादा यामुळे पाणी समस्या भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. चोविसतास पाणी पुरवठ्यासाठी सुरु असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नावर यामुळे पाणी फिरण्याची भिती आहे. पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र, समाधानकारक पाऊस होवूनही भाजपच्या काळात पाणी टंचाईच्या तक्रारी वाढल्याचा सूर सर्वत्र आहे. नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. यामध्ये खरोखरीच भाजपचे नियोजन चुकतेय की, महापालिकेतील अधिकाऱ्यांचा अघोषित असहकार त्याला कारणीभूत ठरतोय याबाबत शहरवासीयांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे.

खासगी शाळांतील शिक्षकांची पदे खातेय कोण ?

शिक्षण सचिव : संस्थाचालक कमी करतात शिक्षकांची पदे 
पुणे – बोगस पटसंख्या प्रकरणातही जितक्‍या मोठ्या प्रमाणात शिक्षक संख्या कमी झालेली दिसली नाही तितकी शिक्षकसंख्या सध्या कमी होत आहे. शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक स्वत:हून शिक्षकांचे पद सरेंडर करत आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली. विद्यार्थ्यांना आधारशी जोडल्याने मोठ्या प्रमाणात बोगस पटसंख्या समोर आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Differently-abled persons likely to get benefit of pension plan

Pimpri Chinchwad: The civic body has proposed to start a pension scheme of Rs1,500 per month to the differently-abled adult citizens.

PCMC to fund ATP event prize

Pimpri Chinchwad: The state government has told the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to share the cost of prize money of the Association of Tennis Professionals (ATP) world tour event, with Mumbai Metropolitan Regional Development Authority (MMRDA), scheduled to be held in January at the Shiv Chattrapati Shivaji Balewadi stadium in Pune.

Chinchwad MLA speaks out against PCNTDA merger

Pimpri Chinchwad: City unit BJP president and Chinchwad MLA Laxman Jagtap has urged chief minister Devendra Fadnavis not to merge the Pimpri Chinchwad New Town-ship Development Authority (PCNTDA) with the Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA).

Anti-Aadhaar activists launch online campaigns

Pune: Anti-Aadhaar activists from Pune as well as across the country have urged citizens to switch off their phones from 11 to 11.30 am till December 11 to protest against the forced linking of Aadhaar number with various services.

पुणेकरांच्या दिमतीला ‘मेट्रो’ची हेल्पलाइन

१८००२७०५५०१ वर संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांसंदर्भात नागरिकांना कोणत्याही अडचणी अथवा शंका असल्यास त्यांना आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रो तर्फे उपाय योजना

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या मार्गिकेवर सहयोग केंद्र आणि ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यान्वित 
प्रभात वृत्तसेवा
पुणे – “महामेट्रो’च्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते दापोडी येथील हॅरीस पूल दरम्यान सध्या व्हायाडक्‍टचे काम सुरू असून यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रोच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्‌ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.

लष्कराकडून बोपखेल उड्डाणपुलाला जागा देण्याची कार्यवाही सुरू; आमदार लक्ष्मण जगतापांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. मात्र आता हा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अ

पुण्याला जुनीच लोकल

पुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या ताफ्यात नवीन लोकल (रेक) दाखल होण्याची अपेक्षा असताना मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेला जुनीच लोकल उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेकडून पुण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचे दिसत असले, तरी रेल्वे प्रशासन मात्र त्यावर गप्प का, अशा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

PMPML to stop rewarding passengers for reporting drivers

As per the numbers available with the PMPML, in 2014, only seven such complaints were reported. The number went up to 16 in 2015, and 37 in 2016.

Pune, PMPML, Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited, daily commuters, pune daily commuters, pune transport, pune news, indian express news, texting, phones, indian express, express online

खिंवसरा पाटील विद्या मंदिरला आदर्श शाळा पुरस्कार

चिंचवड – शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते खिंवसरा पाटील विद्या मंदिर शाळेला 2016-17 शैक्षणिक वर्षाचा आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

बालसंपादकांनी जाणले वृत्तविश्‍व

पिंपरी - चेहऱ्यावरील कुतुहलमिश्रित भाव.. त्याबाबत पडलेले असंख्य प्रश्‍न.. माध्यमांविषयीची आस्था आणि त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा..असे भारावलेले वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने सोमवारी (ता. ११) अनुभवले. निमित्त होते ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या ‘सकाळ एनआयई’तर्फे ‘बालदिना’निमित्त हा उपक्रम आयोजिण्यात आला होता. शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांनी ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. 

साडेनऊशे संस्थाकडून लेखापरीक्षण

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाविषयी जागृती आली असून, शहरातील ९५० संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सहकार खात्याकडे सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये १५ टक्‍यांची वाढ झाली असल्याचे सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय सर्वसामान्यांना भुर्दंड देणारा – खासदार श्रीरंग बारणे

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या बाबतचा आदेश आल्यानंतर ह्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कमी होणार असुन ज्या बांधकाम व्यावसायीकांनी अनधिकृत इमारती बांधून विकल्या त्या बांधकाम व्यावसायिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने किती बांधकामे या निर्णयामुळे अधिकृत होतील हा मोठा संशोधनाचा भाग असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड देणारा निर्णय असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत नदी वाचवा-जीवन वाचवा संदेश देण्यासाठी सायकल रॅली

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नदी वाचवा-जीवन वाचवा हा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५०० पेक्षा जास्त विविध शाळांचे विद्यार्थी व सायकलप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

केसपेपरसाठी अतिरिक्‍त शुल्क आकारणी?

चौकशीची मागणी : “वायसीएम’ रुग्णालयातील प्रकार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांना केसपेपर देताना काऊंटर क्रमांक 4 मध्ये आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागासाठी वेगवेगळे 10 रुपये आकारले जात असून, त्यामध्ये तेथील कर्मचारी गोलमाल करत आहेत. त्याची चौकशी करावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.

भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे पद रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

चौफेर न्यूज  महापालिकेच्या दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 (ब) मधील भाजपाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण धोंडू उंडे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार देवून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या रद्द करा

चौफेर न्यूज –  महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात, अन्यथा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे, असे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.