Thursday 16 November 2017

Maharashtra bans construction within 100 feet of hill slopes

As per the government resolution, the planning authority, while preparing the development plan of their respective area, should mark a ‘no development zone or open space’ within a 100 feet area of hill slopes.


दहा वर्षे फेरीवाला धोरणाची फक्त चर्चा


अतिक्रमणांमुळे हरवले रस्ते


सहायक आयुक्त डोईफोडे यांच्याकडे अतिरिक्त जबादा-या; आयुक्तांनी आपले अधिकार सोपवले

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आपल्याकडील काही जबाबदा-या प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे आयुक्त हर्डीकरांकडील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव

पुणे - शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानची मेट्रो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केली जात आहे. केंद्र सरकारच्या "न्यू मेट्रो पॉलिसी'नुसार दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन प्रस्ताव पाठविणार आहे, अशी माहिती "पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
 

वाहतूक कोंडी टाळणार “क्‍विक रिस्पॉन्स टीम’

पिंपरी – महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड परिसरात वेगाने काम सुरू आहे. पालिका ते दापोडी हॅरीस पूल दरम्यान व्हायाडक्‍टचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी प्रचंड होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रोने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार पिंपरी महापालिका ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेवर वल्लभनगर, एसटी स्टॅण्डमागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पाणी आरक्षणासाठी जलसंपदा मंत्र्यांना भेटणार – पक्षनेते एकनाथ पवार

पक्षनेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बैठक; २४ x ७ पाणी पुरवठ्याबाबत शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा 

शहराचा पाणीपुरवठा गुरूवारपर्यंत विस्कळीत; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. पवना नदीतील रावेत बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी होऊन शहरातील पाणी वितरणावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आज दि.१५ संध्याकाळी आणि गुरूवारी विस्कळीत तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व जलनिःसारण विभागाचे सह शहर अभियंता यांनी दिली आहे.

काही मिनिटांत होणार डेंगीच्या तापाचे निदान

पुणे - लक्षणे दिसताच अगदी काही मिनिटांमध्ये डेंगीच्या तापाचे निदान करणे "डेंगी डे 1 टेस्ट'मुळे शक्‍य झाले आहे. रुग्णाला संसर्ग झालेला विषाणू नेमका प्राथमिक अवस्थेत आहे की तो दुसऱ्या टप्प्यावर पोचला आहे, याची माहितीही यातून अचूक मिळणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना रुग्णावर वेळेत, प्रभावी उपचार आणि डेंगीचे व्यवस्थापन करता येईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. डेंगीच्या या निदान चाचणीचा खर्च चार पटीने कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पाच टक्के "जीएसटी'ची अंमलबजावणी

पुणे - हॉटेलच्या बिलावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत; मात्र बुधवारी पहिल्याच दिवशी शहरातील काही हॉटेल्स व्यावसायिकांनी त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बदल केला नव्हता. काही व्यावसायिकांनी बदल केल्यामुळे त्यांना पाच टक्केच जीएसटी द्यावा लागला. विशेष म्हणजे पाच टक्के जीएसटी आकारल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून रीतसर बिलही देण्यात येत होते. 

पॅथॉलॉजी लॅब होताहेत "डिजिटल'

पुणे - विविध प्रकारच्या आजारांचे निदान करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या रक्त व लघवीच्या चाचण्या करणाऱ्या "पॅथॉलॉजी लॅब' आता डिजिटल होऊ लागल्या आहेत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातील 70 टक्के लॅब आता अत्याधुनिक लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरत असून, त्यामुळे डॉक्‍टर व रुग्णांना फायदा होत आहे. 

शहरातील रस्ते – गटर्स सफाईसाठी 68 संस्थांना पुन्हा मुदतवाढ

चौफेर न्यूज  जुन्या रचनेनुसार अ, ब, क, ड, इ आणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील रस्ते आणि गटर्स साफ-सफाईचे काम पूर्वीच्याच 68 स्वयंरोजगार व बेरोजगार सेवा संस्थांना महापालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ देणार आहे. कामाची ठेका देण्याची पद्धत बदलता येत नसल्याने महापालिका प्रशासनाला नाईलाजास्तव 4 कोटी 60 लाख 90 हजार 920 रुपये खर्चाला उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुदतवाढ द्यावी लागत आहे. स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी सेवा संस्था आणि मजूर सहकारी संस्था यांना किमान वेतन दराने सदर काम देण्यात येते. दोन वर्षे कालावधीत या कामासाठी 87 पैकी 68 संस्था पात्र ठरल्या. त्यांनी एकूण 925 कामगार किमान वेतन दराने पुरवले. या कामाची मुदत 31 मार्च 2017 ला संपली.