Wednesday 20 December 2017

5 must have apps for government services

These mobile apps provide easy access to a host of government services.

Besides ease of use, the biggest selling point of BHIM is that all major banks on the UPI platform are linked to it.

[Video] पुण्यात मेट्रो कात्रज पर्यंत... पिंपरीत निगडी पर्यंत कधी?

पुणे मेट्रोचा विस्तार होणार का ?

शहरात मीटरप्रमाणे रिक्षाप्रवास

पिंपरी - शहरातील प्रवाशांच्या मागणीनुसार रिक्षाचालक, रिक्षा संघटना यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे मान्य केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा पंचायत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक विभाग) आणि क्रांती रिक्षा सेना या संघटनांनी रिक्षाथांब्यांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याबाबत सदस्यांना सूचना दिल्या; तसेच अंमलबजावणीही सुरू केली.

पाइप गॅसचे नवीन ४० हजार जोड

पिंपरी - शहरात दिवसेंदिवस पाइप गॅस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) २०१८ मध्ये ४० हजार नवीन गॅसजोड देण्याचे नियोजन केले आहे. हिंजवडी, चाकण या परिसरांतही ही जोड वाढवण्याची योजना तयार करण्यात आली असल्याचे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी सांगितले. 

‘अमृत योजने’अंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये उभारणार ३५ लिटर पाण्याची टाकी

पिंपळे सौदागरमध्ये ‘अमृत योजने’अंतर्गत ३५ लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज पाणीपुरवठा अधिकार्यांसोबत पाहणी करून टाकी उभारण्याची जागा निश्चित केली आली.

आदर्श सोसायटी योजनेची अंमलबजावणी सुरू; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती

स्वच्छ भारत अभियानचा प्रसार व प्रचार होण्यासाठी महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी योजना राबविली आहे. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून त्यासाठी सोसायट्यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जसाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने जास्तीत जास्त सोसायट्यांनी अर्ज करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

शाहूनगरमध्ये साडेतीन टन कचरा संकलन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगरमध्ये अ प्रभागाच्या वतीने स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मोहिमेत साडेतीन टन कच-याचे संकलन करण्यात आले.

बीआरटीचे जानेवारीत सर्वेक्षण

बहुचर्चित निगडी-दापोडी-निगडी बीआरटीएस प्रकल्पाचे आयआयटीकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तर, तत्पूर्वी मंगळवारी (२६ डिसेंबर) महापालिकेकडून बीआरटी मार्गात ‘ट्रायलरन’ करण्यात येणार असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. आयआयटीकडून सर्वेक्षण अहवाल आल्यावर, तो हायकोर्टात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होताच या मार्गावरील बीआरटी सुरू करण्यात येणार आहे.

लेखा परिक्षणातील गैरकारभाराचा अहवाल पाठवा

  • नगरविकास विभागाचा आयुक्‍तांना आदेश ः विभाग प्रमुखांचे धाबे दणाणले
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या लेखापरिक्षणातील प्रलंबित आक्षेप आणि आक्षेपाधीन ठेवलेल्या रक्कम वसुलीची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून त्यांचा सविस्तर अहवाल तत्काळ पाठवण्याचे आदेश नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी सभा

निगडी – संस्कृती संवर्धन व विकास महासंघ पिंपरी चिंचवड व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

उद्योगनगरीतील वीज समस्या सोडवणार!

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील विजेच्या विविध तक्रारींबाबत तसेच वीजवितरण विभागात असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.

पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्यास पेट्रोलपंप चालकांची हरकत

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका क्षेत्रातील पेट्रोलपंपांवर असले;ली स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्याचा आदेश नुकताच काढला असून पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने याला हरकत घेतली आहे.

अग्नीशमन विभागाचा सावळा गोंधळ

पिंपरी – महापालिकेच्या अग्नीशमन सेवेसाठी लागणारे साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेव्दारे करण्यात आली. परंतु, ही साहित्य खरेदी करताना अग्नीशमन सेवेच्या संचालक यांची तांत्रिक मंजुरी घेतली नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे महापालिका अग्नीशमन अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शहरबात पिंपरी-चिंचवड : भाजप-शिवसेनेत वर्चस्वाची कुरघोडी

पिंपरी महापालिकेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’ येणे अपेक्षित असताना, भाजप-शिवसेनेतच कलगीतुरा रंगलेला आहे. नऊ महिन्यांपूर्वीच्या पालिका निवडणुकांचे संघर्षांचे वातावरण अद्याप निवळले नाही. भाजप-शिवसेनेत आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही विधानसभा आणि मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर, त्या ठिकाणी आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेची लढाई आहे. यामुळेच निवडणुकांचे पडघम सुरू होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वाची कुरघोडी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शिवसेने’च्या मदतीला धावून आली ‘मनसे’

सतत एकमेकांविरोधात टीका टिपण्णी करणाऱ्या शिवसेना-मनसे नेत्यांच्या भुमिका असताना. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या मदतीला धावून आली. यासाठी निमित्त ठरले एक संगणक.

Sena leader wants PCMC chief transferred over 'corruption'

Maruti Bhapkar has written to the CM, alleging dubious decisions made; while NCP supports him, BJP has scoffed
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems to forever have trouble with its commissioners. With Shrikar Pardeshi, demands for a transfer occurred because he was deemed far too upright and outspoken. Now, similar requests are being made to transfer current chief Shravan Hardikar over allegations of corruption.

कॉनक्वेस्टच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत भरारी

पिंपरी– चिखलीतील महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या कॉनक्वेस्ट महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहल आचार्य हिने कंपाउंड राऊंड 50 मीटर आर्चेरी (धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम तर विभागात चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या यशामुळे तिची ऑल इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी

चौफेर न्यूज – बोपखेल परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात गुन्हेगारीही त्याचप्रमाणात वाढत असून बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी माय माऊली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश तेजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदींना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोपखेलची सद्यस्थितीत 25 ते 30 हजार लोकसंख्या असून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय आदी नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु, बोपखेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. पोलीसात तक्रार देण्यासाठी नागरिकांना भोसरी येथील पोलीस ठाण्यात 10 ते 15 किलो मीटरचा वळसा मारून यावे लागते. त्यामुळे अनेक नागरिक तक्रार देण्याचे टाळतात. तथापि, बोपखेलसाठी त्वरीत स्वंतत्र पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी माय माऊली प्रतिष्ठानचे रूपेश तेजी, रामदास गोसावी, स्वप्निल मेदगे आदींनी केली आहे.