Thursday 28 December 2017

सुसंस्कृत शहरांत ‘हॉर्न’ची विकृती

पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांचे कर्कश ‘हॉर्न’ ऐकायला मिळतात. शांतता भंग करणाऱ्या आणि शेजारून जाणाऱ्यांच्या काळजात ‘धस्स’ करणाऱ्या ‘हॉर्न’ची विकृती शहरांत वाढीस लागली आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचे. ना महापालिका प्रशासनांना काही देणे-घेणे, ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाला. विकृत ‘हॉर्न’चा त्रास मात्र, सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या काही प्रातिनिधिक प्रसंगावरून ‘हॉर्न’ची विकृती अधिक अधोरेखित होते. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालणे आवश्‍यक आहे.

वृत्ती बदलायला हवी

निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

A New Year resolve: Pune Metro may take off in a year’s time

Pimpri-Dapodi route on Corridor One will be first one to get green signal: MAHA-Metro

Pune metro, Pune metro trial, Pimpri-Dapodi route, Pune transport, Pune news

Police have little idea about animal rights, say activists

Police have little idea about animal rights, say activists

वाहनतळांसाठी आरक्षित जागा विकासाचा प्राधिकरणाचा निर्णय

प्रस्तावाला प्राधिकरण सभेने नुकतीच मंजुरी दिली.

…अखेर मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यासाठी स्थायी समितीने ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दशक्रिया विधी घाटाचे काम सुरु झाल्यामुळे मोशीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

औषध भांडार विभागात घडतयं काय?

पिंपरी – महापालिकेच्या वैद्यकीय औषध भांडार विभागातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषध व विविध उपकरणांची खरेदी करण्यात येते. त्याच भांडार विभागाचे मुख्य व्यवस्थापक गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी रजेवर असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पाठविला आहे. परंतु, ते कोठे व कोणाच्या संपर्कात आहेत. याबाबत त्यांचे कुटुंबीयही काहीच सांगत नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलंय? अचानक रजा घेवून स्वेच्छानिवृत्ती मागतली आहे. याबाबत वैद्यकीय आणि पालिका प्रशासनाने कमालीची गोपनियता ठेवली आहे. याविषयी संबंधित अधिकारी माहिती देत नसल्याने वैद्यकीय भांडार विभागात नेमकं घडतय काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

“इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कामगारांची विभागणी

पिंपरी – महापालिकेच्या “इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रस्ते व गटर्स साफसफाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या 529 कामगारांची विभागणी करून त्यातील 253 कामगारांना “क’ आणि “ह’ तर उर्वरीत 276 कामगारांची नेमणूक “इ’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील साफसफाई कामासाठी केली आहे. याकरिता पूर्वीच्याच निविदा रक्कमेत हे काम नवीन ठेकेदारासोबत करार करून देण्यात आले आहे. याबाबत मांडलेल्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

SC: Prove gram panchayats as developed as municipal areas

Pune: The Supreme Court recently told the owners of around 250 closed liquor establishments in the jurisdiction of gram panchayats to prove their areas were as developed as municipalities for the rollback of highway alcohol ban in those places.

पीपीएफ, एनएससीच्या दरात 0.2 टक्के कपात

नवी दिल्ली – विविध छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार पीपीएफ आणि एनएससीसारख्या छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात 0.2 टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात जानेवारी ते मार्च 2018 या त्रैमासिक दरम्यान लागू राहणार आहे. मात्र वरिष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षाच्या बचत योजनांसाठी व्याजदर 8.3 टक्केच कायम राहणार आहे.

बालचमूंनी भरवला “आठवडे बाजार’

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै. विठ्ठलराव सखाराम सोनवणे प्राथमिक शाळा क्रमांक 93 मध्ये ग्राहक दिनानिमित्त आठवडा बाजार भरला होता.

दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान

– पशुप्रेमी मच्छिंद्र तापकीर यांची सतर्कता
पिंपरी – काळेवाडी-तापकीरनगर मधील पशूप्रेमी तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान मिळाले.

“लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’चा उच्छाद

पिंपरी – मागील भागात पुणे-बंगळूरू द्रूतगती महामार्गावर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटची माहिती घेतली. मात्र, शहराच्या विविध भागांत “लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’ ला उधाण आल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांमध्ये खुणावणारे “लॉज’चे बोर्ड दिसले की याठिकाणी लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट सक्रीय असल्याचे समजण्यास हरकत नाही, एवढी परिस्थिती बिकट झाली आहे.

[Video आरबीआयचा पिंपरीतील एचडीएफसी बँकेला दणका…!

पिंपरी (Pclive7.com):- नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे इंगळूण येथील आदिमाया माध्यामिक शाळेला ई लर्निंग संच भेट

जुन्नर तालुक्यातील इंगळूण या दुर्गम व आदिवासी पाड्यावरील आदिमाया माध्यामिक शाळेला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांनी रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ यांच्या सहाय्याने नुकताच एक ई लर्निंग संच भेट दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट रो. विलास गावडे, रो. सतीश आचार्य, रो. वैजयंती आचार्य, रो. वसुधा गावडे,  महेश ढोले, शाळेचे मुख्याध्यापक मारुती ढोबळे, शाळेचे इनामदार सर व विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरीत बनावट शॅम्पू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी ब्रँडेड शॅम्पू वापरत असाल तर सावधान...पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट ब्रँडेड शॅम्पू बनविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भंगारातून जमा केलेल्या बाटलीत केमिकल टाकून शॅम्पू विकणाऱ्या या टोळीतील चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी डव्ह, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल आदी नामवंत कंपनीचे बनावट शॅम्पू जप्त केले आहेत.

हलगीच्या गजरात खंडोबाची पालखी मिरवणूक

निगडी – आकुर्डी येथील खंडोरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. खंडेरायास अभिषेक करण्यात आला. वाजंत्री व हलगी पथक तसेच ढोल ताशा या वाद्यांच्या गजरात श्रींच्या काठीची व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली.