Friday 5 January 2018

निगडी-दापोडी बीआरटी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक – सिमा सावळे

निगडी ते दापोडी मार्गावर महापालिकेने बीआरटी बससेवा सुरू करणे नागरिकांसाठी धोकादायक आहे. त्यासाठी निगडी ते दापोडी बीआरटीला आपला विरोध असून ही बीआरटी रद्द करावी, अशी भूमिका महापालिका स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी मांडली आहे. त्यांनी बीआरटी रद्द करून शासनाला निधी परत करावा लागल्यास तसेही पालिकेने करावे, अशा सूचना स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांना केल्या आहेत.

केएसबी चौक ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन: निगडी ते भोसरी मार्ग सुकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केएसबी चौकातील डावीकडील ग्रेड सेपरेटरचे उदघाटन गुरुवारी (दि. ४) महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांच्या हस्ते झाले.

‘कात्रज-निगडीचा डीपीआर तयार करा’

पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तांचे महामेट्रोला पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेले मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या विस्ताराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याची चिन्हे आहेत. स्वारगेटचा विस्तार कात्रजपर्यंत, तर पिंपरी-चिंचवडची मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे पत्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) दिले आहे. त्यानुसार, डीपीआरच्या कामाला पुढील काही दिवसांत गती मिळण्याचे संकेत महामेट्रोने दिले आहेत.

स्थायी समितीकडून ३८ कोटींच्या कामांना मंजुरी

शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

Bapat comes to women self-help groups' aid

PIMPRI CHINCHWAD: Guardian minister Girish Bapat directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to take initiative and get sub-contracts from industries for the women self-help groups (SHG). Civic chief Shravan Hardikar was given the directive on Thursday during the inaugural programme of PCMC's 10th Pavanathadi Jatra being held at Sangvi.

Bhosari MLA tells officials to expedite water projects

PIMPRI CHINCHWAD: Bhosari MLA Mahesh Landge has asked the civic boy to expedite the work of laying pipelines from Bhama Askhed and Andra dams.

‘कात्रज-निगडीचा डीपीआर तयार करा’

पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तांचे महामेट्रोला पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेले मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या विस्ताराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याची चिन्हे आहेत. स्वारगेटचा विस्तार कात्रजपर्यंत, तर पिंपरी-चिंचवडची मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे पत्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) दिले आहे. त्यानुसार, डीपीआरच्या कामाला पुढील काही दिवसांत गती मिळण्याचे संकेत महामेट्रोने दिले आहेत.

दंड न भरल्यास बांधकामे नियमित होणार नाहीत

पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या कामाचा आयुक्त हर्डीकर यांच्या उपस्थितीत नुकताच आढावा घेण्यात आला.

बचत गटांना शून्य टक्‍के व्याजाने कर्ज शक्‍य

नवी सांगवी - एकीकडे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या दिवाळखोरीत निघत असताना दुसरीकडे महिलांचे बचत गट मात्र, उभारी घेताना दिसत आहेत. कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे व नियमितपणे होत आहे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच भविष्यात बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन ऍक्‍सिस बॅंकेच्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा (पश्‍चिम विभाग) अमृता फडणवीस यांनी केले. 

स्वामी विवेकानंद क्रीडा महोत्सवास सुरुवात

पिंपरी – विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी-चिंचवड महानगर आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंद क्रीडा महोत्सवाची सुरुवात आज ( दि. 4) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे झाली.

ई-कचरा संकलन चळवळ व्हावी

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समिती यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ई-कचरा संकलन मोहिमेचे रुपांतर सामाजिक चळवळीत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Why should film viewers buy food from theatres: Bombay HC to Maharashtra govt

MUMBAI: The Bombay High Court on Thursday directed the Maharashtra government to file a reply to a PIL challenging the prohibition on carrying outside food into movie theatres and multiplexes across the state.

The court asked when security guards frisk the public entering cinema halls and check their bags, what was the need to keep all their food items and force them to purchase food from theatres.

‘पवना बंद जलवाहिनी’च्या लोखंडी पाईपची चोरी

पवना धरणातून थेट बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी खरेदी केलेले लोखंडी पाईप रस्त्यावर पडून गंजत आहेत. गॅस कटरच्या साह्याने पाईप कापून त्याचे तुकडे करून चोरीचे प्रकार घडत आहेत. याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जलवाहिनीसाठी महापालिकेने आणलेले लोखंडी पाईप रस्त्यावर पडून आहेत. मुकाई चौक किवळे बस टर्मिनससमोरील रस्त्यावर हे पाईप पडून आहेत. लोखंडी पाईप गंजून गेले आहेत. लोखंडी पाईपवरील क्राँकीट काढून गॅस कटरच्या साह्याने पाईप कापून त्याचे तुकडे केले जातात आणि ते तुकडे चोरून गेले जात आहेत.