Saturday 24 February 2018

पीएमपीला "अच्छे दिन'

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात 200 मिडीबस 8 मार्चपासून टप्प्याटप्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. तर महिलांसाठीच्या खास "तेजस्विनी' बसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यावर येत्या सोमवारी (ता. 26) निर्णय होईल. दरम्यान, बीआरटी मार्गांसाठी 550 एससी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत स्वतः घेणार आहेत. 

भूखंडांना बाजारमूल्याच्या अडीचपट मोबदला

पुणे - मेट्रो प्रकल्प उभारताना स्थानके, वाहनतळ आदींसाठी राज्य सरकारने आरक्षित केलेल्या भूखंडांचे संपादन करताना मोबदला म्हणून संबंधित जागामालकाला बाजारमूल्याच्या तब्बल अडीचपट रोख रक्कम महामेट्रो देणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी भूसंपादन वेगाने होऊ शकते. दरम्यान, वनाज-रामवाडी मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा काळाबाजार; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रावेत : घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

रिझर्व्ह बँकेचा एसएमएस तुम्हाला आला का?

नवी दिल्ली : दहा रुपयांच्या कॉईन बद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अफवा पसरलवल्या जात आहेत. मात्र नागरिकांनी त्यापासून दूर राहावे, यासाठी रिझर्व्ह बँकेने आता सर्व बँकांच्या ग्राहकांना एसएमएस पाठवून जनजागृती सुरू केली आहे.

बांधकाम व्यावसायिक, ज्वेलर्सच्या ठेवी योजना ठरणार नियमबाह्य!

नवी दिल्ली : जमीन-जुमला (रिअल्टी) क्षेत्रातील विकासक तसेच ज्वेलर्स क्षेत्रातील कंपन्यांनी सादर केलेल्या हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना यापुढे पोंझी योजना ठरणार आहेत. या योजना ‘नियमबाह्य ठेवीं’च्या कक्षेत येतात, असे केंद्र सरकारचे मत आहे.

पालिकेच्या रुग्णालयांlत वॉटर एटीएम मशीन बसविण्याची जलकल्याण समितीची तयारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च करण्याची समितीने तयारी दर्शविली आहे.