Wednesday 7 March 2018

Savale proposes swimming pool

Pimpri Chinchwad: The outgoing standing committee chairperson of the civic body, Seema Savale, has come up with a proposal for a swimming pool near the district centre in Pradhikaran at Sector 6 after a plan for a similar facility at Indrayaninagar on public private partnership was deferred in July last year.

‘मेट्रो’कडून 86 वृक्षांना जीवदान

पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. कामात अडथळा ठरणारी झाडे न तोडता त्याचे पुनर्रोपण केले जात आहे. महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्षांचे अद्ययावत पद्धतीने पुनर्रोपण करून त्या झाडांना जीवदान दिले आहे. ही पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिका व बांधकाम व्यावसायिकांनी अवलंबिल्यास शहरातील शेकडो झाडांना जीवदान मिळू शकते, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 

‘स्मार्ट सिटी’साठी स्थानिक सल्लागार समिती

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’मध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून शहरपातळीवर स्थानिक सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये शहरातील खासदार, आमदार, महापौरांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तरुण यांचा समावेश असणार आहे. 

पिंपरी-चिंचवडसाठी लवकरच ज्येष्ठ नागरिक धोरण: पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती

पिंपरी चिंचवड महापालिका शहरासाठी सर्वसमावेश ज्येष्ठ  नागरिक धोरण तयार करणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी (दि.५) झालेल्या बैठकीत या धोरणाबाबत चर्चा झाली. त्यानुसार शहरातील ज्येष्ठांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत उपक्रम राबविण्याचे विचाराधीन असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

Passengers ask for extra coach

Regular travellers from Chinchwad on Sinhagad Express ask for more space

Passengers from Chinchwad, who travel daily on the Pune-Mumbai Sinhagad Express, are tired of putting forth their demands of providing a separate railway coach for passengers from that part of the city, as they complain of insufficient space in the coach meant travellers from Pimpri-Chinchwad.

PMPML dead set about seats reserved for women

PUNE: Men occupying women’s seats on Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) buses, beware! You could be hauled to the nearest police station for refusal to vacate seats meant for the fairer sex.

अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव उत्साहात संपन्न

पिंपरी (Pclive7.com):- अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न घेता सलोख्याने १२ दिवस शिवजन्म महोत्सव पिंपरीगावात साजरा करण्यात आला.

पिंपरीत महापौर बदलाचे वारे; शत्रुघ्न काटेंसाठी नगरसेवकांचे शहराध्यक्षांकडे साकडे!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडमध्ये जात असल्याने पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला. महापौरांच्या त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. आता महापौर पद देखील चिंचवडमध्येच खेचण्यासाठी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. महापौरपदी शत्रुघ्न काटे यांची वर्णी लागावी यासाठी चिंचवड विधानसभेतील नगरसेवकांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगतापांकडे साकडे घातले आहे.

भ्रष्टाचारावर विरोधी पक्षनेत्यांची तोंडावर पट्टी ssss

पिंपरी – महापलिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पालिका सभागृहात काही बोलायचे नाही, पण सोशल मिडियावर भाजप सरकारच्या पारदर्शक कारभारावर चुप्पी… घेतलेले मेसेज वायरल केले आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

[Video] "पिंपरी चिंचवड मध्ये तीसरे लोककला संमेलन "


शहरबात पिंपरी : स्थायी समितीचा ‘परीसस्पर्श’

भाजपमध्ये उलथापालथ झाली आणि एकूणच पालिकेचे राजकारण ढवळून निघाले.

मार्चअखेर म्युरल्सद्वारे साकारणार बाबासाहेबांचा जीवनप्रवास

पिंपरी - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात मार्चअखेर बाबासाहेबांचे जीवनप्रवास म्युरल्सद्वारे साकारण्यात येणार आहे. ब्रॉंझ धातूतील एकूण 19 म्युरल्समध्ये बाबासाहेबांचा जन्म ते महापरिनिर्वाण असे प्रसंग चितारले आहेत. त्यामुळे स्मारक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

एम्पायर इस्टेट पूल एप्रिलअखेर पूर्ण

पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरील पूल आणि त्याला जोडणारा काळेवाडी फाट्यापासूनचा रस्ता एप्रिलअखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील सर्वांत लांब असणाऱ्या (1.6 किलोमीटर) या पुलावरून एप्रिलअखेरीला वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या मार्गावरून बीआरटी बससेवाही ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. 

पिंपरी चौकाला अतिक्रमणांचा विळखा

पिंपरी - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडला असून अवैध धंदे, बेशिस्त रिक्षाचालक आणि तळीरामांचा अड्डा यामुळे चौकाचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

'कौशल्य असल्यास नोकरी मिळविणे सोपे '

पिंपरी -  ‘‘सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तरुणांनी उद्योगातील मागणीनुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी मिळविणे सोपे जाईल. तरुणांनी खचून न जाता आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,’’ असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केले. 

पिंपरी –चिंचवड महापालिकेच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवार, दि.०६ मार्च २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत करण्यात आले असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. 

स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम गेली दोन वर्षे रखडलेले

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्रं 32 मधील पवना नदी तिरावर असलेल्या स्मशानभुमीचे काम गेली दोन वर्षापासुन संथ गतीने सुरू असल्याने सांगवी व परिसरातील नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे पावणे तीन कोटी रूपये नुतनिकरण खर्चाचे हे काम स्थापत्य विभागामार्फत प्रस्तावान्वये शेड्युल बी मधील रकमेपेक्षा 2.50% दराने स्विकृत केले होते. त्यानुसार कामाचा आदेश विर्गत करण्यात आला होता.

थकबाकीदार मिळकतींवर महापालिकेची “टाच’

पिंपरी – मिळकत कराची पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा महापालिका बजावत आहे. त्यासोबत महापालिकेने आजअखेर 24 मिळकतींवर थेट जप्तीची कारवाई केली. त्यापैकी 21 मिळकतधारकांकडून सुमारे दोन कोटी वसूल झाले आहेत. तर, तीन मिळकतींना महापालिकेने “टाच’ लावली आहे.

नियम मोडणारे वाहनचालक “पोलिसांच्या तावडीत’

नियम मोडणारे वाहनचालक “पोलिसांच्या तावडीत’
डिव्हाईसची मदत : दंड न भरणाऱ्यांवर नाकाबंदीच्या माध्यमातून कारवाई
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.6 – वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे. मात्र, कारवाईनंतर ज्यांच्याकडे क्रेडिट/डेबिट कार्ड नसेल, त्यांच्यासाठी व्होडाफोन कंपनीच्या स्टोअरमध्ये रोख दंड भरण्याची सोय करण्यात आली आहे.

जयंती महोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांचा खटाटोप

पिंपरी – महापुरूषांचा जयंती महोत्सव आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या माध्यमातून सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जयंती महोत्सव झालाच पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाचे नियम आणि न्यायालयाच्या चौकटी मोडीत मार्ग काढण्याचे आदेश महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यावर आयुक्तांनीही यावर मार्ग काढण्याचे आश्‍वासन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.