Sunday 11 March 2018

मेट्रो फेज 1 निगडीपासून या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करून एक महिना उलटला!

1 Month ago we did #HungerStrike at Pimpri chowk, still we are waiting for decision! मेट्रो फेज 1 निगडीपासून या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करून एक महिना उलटला!

नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
- त्वरित पिंपरी-निगडी मेट्रोचा DPR पूर्ण करणार
- नागरिकांवर पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन देणार नाही
- अधिवेशनात मेट्रो निगडीपासून सुरु करण्यासाठी लक्षवेधी मांडणार
- पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करणार
- राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुदीसाठी पाठपुरावा करणार
- पिंपरी-चिंचवडवर दुजाभाव होऊन देणार नाही

DID WE MISSED GOOD OPPORTUNITY?

NO STATE BUDGET for #MetroFromNIGDI

नागपूर लाडके; पुण्याला मात्र दोडके!

पुणे: मेट्रोसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन देणाऱ्या राज्य शासनाने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात वेगाने होणार असल्याने महामेट्रोने 850 कोटींची मागणी केली होती. मात्र, शासनाने फक्‍त 130 कोटी रुपये देत पुणे मेट्रोची बोळवण केली आहे. त्यात 100 कोटी समभागापोटी, तर 30 कोटी कर्ज उभारणीसाठी दिले आहेत. म्हणजेच, मागणी केल्यापैकी अवघी 15.30 टक्के रक्कम पुण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी नागपूर मेट्रोसाठी महामेट्रोने पुण्याएवढाच निधी मागितला असताना, शासनाने नागपूर मेट्रोला 310 कोटींचा निधी (36.50 टक्‍के) मंजूर केला आहे.

पुणे ‘महामेट्रो’ला वाटाण्याच्या अक्षता

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाने जोर धरलेला असताना राज्य शासनाने निधी वाटपात केलेल्या कंजुषीने या प्रकल्पाच्या प्रगतीला बाधा येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पुणे मेट्रोचे काम वाढणार असल्यामुळे निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी पुणे महामेट्रोने शासनाकडे 850 कोटींची मागणी केली होती; मात्र शासनाने फक्त 130 कोटींचा निधी मंजूर करून पुणे मेट्रोला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. याउलट नागपूर मेट्रोला पुण्याच्या मेट्रोएवढीच मागणी केली असताना नागपूरला मात्र भरघोस 310 कोटींचा भरघोस निधी मंजूर केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून 500 रुपयांतच मासिक पास

पुणे : शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीचा मासिक पास येत्या सोमवारपासून (ता. 12) सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

चोरीची गाडी खरेदी करणाऱ्यालाही तीन वर्षे शिक्षेची तरतूद

पुणे : शहर व पिंपरी- चिंचवड परिसरात दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात सर्रास विकणाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या दुचाकी कमी पैशांत आणि तत्काळ विकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कमी पैशांच्या आमिषाने या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या व्यक्‍तीवर (रिसिव्हर) तीन वर्षे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठीची पुरेपूर काळजी घेतानाच, जुनी दुचाकी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याचीही खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नंबरवर अस्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी

पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असूनही, तक्रारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मागील चार महिन्यांत पालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर दाखल झालेल्या 1 हजार 306 तक्रारींपैकी तब्बल 736 तक्रारी अस्वच्छतेचा आहेत.

Agency to be hired for HBOT centre at YCMH

Pimpri Chinchwad: A private agency will be appointed for a duration of 20 years for the Hyperbaric Oxygen Therapy (HBOT) centre at Yashwantrao Chavan Memorial Hospital run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

Pune conciliation forum resolves two cases in maiden meeting

PUNE: Two cases from the city were resolved in the first Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) conciliation forum meeting on Saturday.
Six cases were referred to the Pune conciliation forum. Of them, two were heard in detail and amicably resolved, stated the forum members from Confederation of Real Estate Development Association of India (Credai) and Mumbai Grahak Panchayat (MGP).

State to roll out blockchain technology for land deals

Pune: The Maharashtra government is ready to roll out the blockchain technology as a pilot project in Pune and Konkan divisions to ensure that all land transaction data are insulated against tampering and hacking.

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त २ शाखांचे उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात २ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते निगडी आणि प्राधिकरण येथील या शाखांचे उद्घाटन झाले.

बीएसएनएलची केंद्रे आज आधार लिंकसाठी सुरू

पुणे : मोबाईल ग्राहकांनी फेरपडताळणी, आधार कार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन बीएसएनएलने केले आहे. त्यासाठी बीएसएनएलची 22 केंद्रे उद्या (ता. 11) सुरू राहणार आहेत. 

कर्वे रस्ता, मॉडेल कॉलनी, औंध, सातारा रस्ता, धनकवडी, बाजीराव रस्ता, भवानी पेठ, येरवडा, हडपसर, चिंचवड, भोसरी, वाकड, तळेगाव, लोणावळा, शिरूर, बारामती, सासवड, दौंड, भोर, राजगुरुनगर, नारायणगाव, मंचर येथील कार्यालयांत हे काम सुरू राहील.

शहरात आज पोलिओ लसीकरण

पिंपरी – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या द्वितीय सत्रानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. शहरातील पाच वर्षाखालील सर्व मुलांना पालिकेच्या 855 लसीकरण केंद्राद्वारे पोलिओ डोस दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.