Friday 11 May 2018

'स्मार्ट' रस्ता

पायाभूत सुविधांबाबत पिंपरी चिंचवड पुण्याच्या तुलनेत सरस आहे. आता नव्या मेट्रो प्रकल्पामुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन जुळ्या शहरांनी स्मार्ट रस्ता अवलंबला आहे. देशात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. पुण्याभोवती औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात भर पडत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जगातील प्रमुख वाहन उद्योग कार्यरत आहेत. हा परिसर चांगल्या प्रकारे जोडला गेलेला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांबाबत पिंपरी चिंचवड पुण्याच्या तुलनेत सरस असून मेट्रोच्या आगमनानंतर त्यात मोठी भर पडणार आहे.

महापालिकेतील ‘खुर्ची बहाद्दरां’ ना दणका ; प्रशासनात उद्यापासून अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांचा धडाका

प्रशासन उद्या काढणार आदेश ः वर्ग 1 ते 3 कर्मचा-यांच्या होणार बदल्या

पिंपरी  – महापालिका मुख्य इमारतीत व क्षेत्रीय कार्यालयात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याकरिता महापालिका प्रशासन विभागाने सर्व विभागाकडून माहिती संकलित केली होती. त्यामुळे तीन व सहा वर्षापेक्षा अधिककाळ झालेल्या अधिका-यांच्या बदल्या केल्या असून त्यासंदर्भात फायलीवर आयुक्तांनी सह्या केल्या आहेत. त्यांचे आदेश उद्या (शुक्रवारी) काढण्यात येणार आहेत.

महापालिकेतील 'खुर्ची बहाद्दरां' ना दणका ; प्रशासनात उद्यापासून अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांचा धडाका

ठेकेदारामुळे पालिकेस ‘कोर्टात’ भरावे लागणार 4 कोटी

निगडीतील जलशुध्दीकरण केंद्राचे काम करणार्‍या एका ठेकेदाराच्या वाढीव खर्चाच्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेला तब्बल 4 कोटी रुपये न्यायालयात ‘डिपॉजिट’ म्हणून भरावे लागणार आहेत. ही रक्कम भरण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.9) मान्यता दिली आहे. न्यायालयीन निकाल पालिकेच्या बाजूने लागल्यास सदर रक्कम परत मिळणार आहे, अन्यथा ती रक्कम जप्‍त केली जाणार आहे.

Pimpri train station can leave citizens exhausted

Pimpri, the biggest business hub between Lonavla and Khadki, boasts of one of the busiest local railway stations. Being a commercial city, the footfall at the station is predominantly from customers and workers employed at the lakhs of shops and other commercial establishments in the area.

Civic panel seal on PCMC parking policy to maintain road discipline

PIMPRI CHINCHWAD: Heavy charges for night parking, creation of four parking zones and fines for parking violation are some of the features of the draft parking policy prepared by the engineering department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

पालिका आखणीनुसारच रस्त्याची रुंदी

पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यान रस्त्याच्या रुंदी रेषेमधील (अलाइनमेंट) विसंगती दूर करण्यासाठी महापालिकेने केलेल्या आखणीप्रमाणेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्यांचा आराखडा करावा, असा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मेट्रो, बीआरटी यांचेही मार्ग त्यानुसार निश्‍चित करण्यात येतील. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठी होणाऱ्या जादा खर्चाचा निर्णय केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याशी शनिवारी (ता. 12) चर्चा करून घेण्यात येईल.

“वायसीएम’ च्या आयसीयू नूतनीकरणासाठी एक कोटी

पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील अती दक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया विभाग नूतनीकरणातील उर्वरीत कामांसाठी एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस यंत्रणा दिवेसेंदिवस कुचकामी ठरू लागल्याने शहरात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढल्याने नागरिकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेमणूक करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे पोलिसांची वेबसाइट अपडेटच्या प्रतिक्षेत

पिंपरी : आजच्या इंटरनेटच्या युगात शासनानेही "डिजिटल इंडिया', "डिजिटल महाराष्ट्र'चा नारा दिला. मात्र, अनेक सरकारी विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनीच त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पुणे पोलिसही त्याला अपवाद नाहीत. मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या संकेतस्थळाचे अपडेशन तब्बल दोन वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून रखडले आहे. सरकारी डोमेन आयडी असलेले हे संकेतस्थळ सध्या बंद असून, वेगळेच डोमेन आयडी असलेले संकेतस्थळ सुरू आहे.

‘सायन्स पार्क’च्या वार्षिक सभासदत्वाला प्रतिसाद

शहरातील सायन्स पार्क हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. विद्यार्थ्यांना याचा वर्षभर लाभ घेता यावा, यासाठी वार्षिक सदस्यत्वाची योजना सुरू केली आहे. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 'सायन्स पार्क'ला विद्यार्थी सुटीच्या काळात मोठ्या संख्येने भेट देतात; परंतु आपल्या शहरातील विद्यार्थ्यांनी फक्त सुटीपुरतीच सायन्स पार्कला भेट देण्याऐवजी वर्षभर भेट द्यावी, या उद्देशाने वार्षिक सदस्यत्वाची योजना सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लायब्ररीसह विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंत ६० ते ७० विद्यार्थ्यांनी या वार्षिक सभासदत्वाचा लाभ घेतला आहे.

आकुर्डी विठ्ठल मंदिर ते निगडीमार्गे आळंदी बस सुरू करा; आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर ते निगडी मार्गे आळंदी बससेवा सुरू करावी, अशी मागणी आकुर्डीतील आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

शंकर गावडे स्मृती कामगार भावनाचे रविवारी भूमिपूजन

पिंपरी- चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्यावतीने थेरगांव येथे उभारण्यात येणाऱ्या कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.१३) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातुन पवना धरणातून गाळ काढण्याची मोहिम सुरूच; २ वर्षात ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात गुरुवारी (१० मे) पवना धरण भागात केली. 

पिंपळे सौदागरमध्ये ‘आंबा महोत्सवाचे’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित करनण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवाचे’ उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनिताताई तापकीर, जयनाथ काटे, बबनराव झिंजुर्डे, शेखर कुटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते, अरुण चाबुकस्वार, अनिल नखाते, भानुदास काटे, वाल्मिक कुटे, चंदाताई भिसे, संजय भिसे, सुप्रिया पाटील, संजय कुटे, जेष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्त उपस्थित होते.

भाजपात ‘ना’राजीनामा नाट्य सुरूच; नगरसेवक वसंत बोराटे यांचा विधी सदस्यपदाचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपपासून फारकत घेण्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच, भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी ‘विधी’ समिती सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. महापौर नितीन काळजे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर देखील केला आहे.

'हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई'

पुणे - जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. जेणेकरून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. काही विकासकामे प्रलंबित असल्यास तत्काळ पाठपुरावा करावा. मात्र, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. 

राष्ट्रवादी शहर अध्यक्षपदाच्या निवडीत गटबाजी उफाळणार?

  • नेत्यांत रस्सीखेच : जयंत पाटील, अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
– अधिक दिवे 
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत पक्षांतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार विलास लांडे, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल असे तीन गट तयार झाले असून आपल्याच गटाचा शहराध्यक्ष बसवण्यासाठी छुपी रस्सीखेच सुरू झाली आहे.

सहाय्यक आयुक्‍त डॉ. डोईफोडे यांचा स्थायीत माफीनामा

पिंपरी – स्थायी सदस्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे प्रशासन विभागचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना चांगलेच महागात पडले. सूचनांच्या अंमलबजावणीबाबत स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी जाब विचारता डोईफोडे यांनी सभागृहाची माफी मागून आपली सुटका करुन घेतली. स्थायी समितीच्या बुधवार दि. 9 ला साप्ताहिक बैठकीत या सर्व घडामोडी घडल्या. डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याने त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी 25 एप्रिलला स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत विलास मडिगेरी यांनी केली होती. या बैठकीनंतर स्थायीची आणखी एक साप्ताहिक बैठक झाली. मात्र, या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी चकार शब्दही काढला नाही.