Tuesday 22 May 2018

PCMC set to build road for Rs150 crore

PIMPRI CHINCHWAD: The civic body will construct a 2km-long road from Walhekarwadi to Dange chowk at an estimated cost of Rs 150 crore.

PCMC to plant 60000 saplings

Pimpri Chinchwad: The garden department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to plant 60,000 saplings this monsoon.

सर्वेक्षणात दीड हजार मिळकतींचा शोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन मिळकतींची पाहणी केली. महिन्याभर झालेल्या या सर्वेक्षणात 1 हजार 455 नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये लाखो रुपयांची भर पडणार आहे.  अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण 8 मधील नियम 5 नुसार मिळकतधारकांनी नवीन, वाढीव बांधकाम केल्यास तसेच जुन्या मिळकतीच्या वापरात बदल केल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या कालावधीत पालिकेस कर आकारणी योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तथापि, बहुतांश मिळकतधारक कर आकारण्यासाठी अर्ज करत नाहीत. त्यामुळे पालिकेचे मिळकतकराच्या रूपात मिळणारे उत्पन्न बुडत आहे.  

पशू, पक्षी, प्राणी का नष्ट झाले?

पिंपरी - शहरात कोणती झाडे, वनस्पती, पशू, पक्षी, प्राणी, जलचर होते, त्यापैकी कोणते नष्ट झाले आणि का, उपाययोजना आदी बाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात जैवविविधतेची पाहणी करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 

पालखी महामार्ग रुंदीकरणासाठी सिग्नल यंत्रणा बंद

पिंपरी – पुणे-आळंदी दरम्यानच्या पालखी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे छोट्या असलेल्या मॅगझिन चौकाचे विस्तारीकरण झाल्याने या चौकाचे क्षेत्रफळ अनेक पटींनी वाढले आहे. मात्र, याठिकाणी बसविलेली सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. ही सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर सुरु करण्याची आग्रही मागणी वाहन चालक, पादचारी व नागरिकांकडून होत आहे.

Pimpri Chinchwad: BRT system connecting Kalewadi, Dehu and Alandi Road to be open to public soon

The third Bus Rapid Transit System (BRTS) in Pimpri Chinchwad, which will connect Kalewadi, Dehu and Alandi Road, is expected to become operational in July. With this BRTS, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will have a higher number of BRT routes in its limits than the Pune Municipal Corporation (PMC).

pimpri chinchwad, brt bus system, brt corridor, pune municipal corp, maharashtra news, indian express

सीओईपीपर्यंत बीआरटी जुलैअखेर

पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावर निगडी ते दापोडीदरम्यान जूनमध्ये बीआरटी बससेवा सुरू होत असून, त्याचवेळी या रस्त्यावरील रेंजहिल्स चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यादरम्यान बीआरटी बसथांबे उभारण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात ये-जा करण्यासाठी सुमारे वीस किलोमीटर रस्त्यावर बीआरटी बससेवा उपलब्ध होईल.

एसी बस खरेदी रद्दचा प्रस्ताव

पुणे - शहरातील बीआरटी मार्गांसाठी ५५० वातानुकूल (एसी) बस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तसेच, ८०० बस विकत घेण्यासाठी फेरनिविदा काढण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रस्तावांवर बुधवारी निर्णय होणार आहे. दरम्यान, पीएमपीच्या ताफ्यात बस कशा पद्धतीने वाढवायच्या, हेदेखील या वेळी ठरणार आहे.

महापालिकेच्या सेमी इंग्रजीचा फज्जा

पिंपरी - महापालिका शाळांमधील पटसंख्या टिकविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ८० शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’चे वर्ग सुरू करण्यात आले; परंतु केवळ अन्‌ केवळ शिक्षकांच्या उदासीनतेमुळे त्यातील ३९ वर्ग बंद पडले आहेत. 

पोलिसांना स्वत:चं घरच नाही!

सरकारकडून घर मिळत नाही... मध्यवर्ती भागात भाड्यानं राहणंही परवडत नाही... ड्यूटीचे तास तर कधीच निश्‍चित नसतात! मग नोकरीच्या ठिकाणापासून १०-१२ किलोमीटर लांब राहणारा सर्वसामान्य पोलिस लांबलेली ड्यूटी संपल्यावर ठाण्यातल्याच एखाद्या कोपऱ्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतो..! पुणे शहराची जबाबदारी खांद्यावर असलेल्या जवळपास ७० टक्के पोलिसांना येथे हक्काचे घर नाही आणि त्यातील नऊ हजारांहून अधिक पोलिसांना सरकारी घरही मिळालेले नाही.

[Video] दिव्यांगांना साहित्य वाटप करणार -अमर साबळे

३४१ दिव्यांगांना साहित्य वाटप करणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली

दिव्यांग व मुद्रा बँक कर्जदारांचे संमेलन व दिव्यांग अर्थसहाय्य योजना मेळावा

सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान, राज्यसभा खासदार अमर साबळे आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली आहे. तसेच यावेळी युवकांना स्वयंरोजगाराची चालना मिळावी यासाठी ‘मुद्रा कर्ज महामेळावा’ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘अर्थसहाय्य योजना मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी दिली.

शंकरवाडीतील रस्त्यांच्या कामाचे आमदार जगतापांच्या हस्ते भुमिपूजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २०, मधील शंकरवाडी, शेल पेट्रोलपंपा जवळील १२ मीटर रुंदीच्या व ९१० मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी झाला.

'डेंग्यू’वर आयुर्वेदिक कॅप्सूलचा उतारा शक्य होणार

एडिस इजिप्ती' या डासांपासून पसरणाऱ्या डेंग्यू या आजारावर कोणताही ठराविक उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण, येत्या काही दिवसांमध्ये यावर एक आर्युवेदिक कॅप्सूलच्या स्वरूपात औषध उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील शास्त्रज्ञ याबाबत अधिक संशोधन करत असून येत्या ऑक्टोबरपर्यंत ही गोळी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

शहरात डास निर्मूलन मोहीम

पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या संख्येने तक्रारीत वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शहरात डास निर्मूलन मोहीम  राबविण्यात येणार आहे.हा निर्णय पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात सोमवारी (दि.21) झाली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, एसटी वर्कशॉपचे आधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. डासांमुळे मलेरिया, डेंगी व चिकुनगुनिया हे आजार होतात. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील नागरिक त्रस्त आहेत. डास निर्मुलनाबाबत मुंबई महापालिकेने राबलिल्या अभियानाप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका अभियान राबविणार आहे.

वल्लभनगर आगारातून नागपूरसाठी स्लीपर कोच

पिंपरी – वल्लभनगर आगारातून वातानुकूलित स्लीपर कोच बस सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा तसेच एसटी महामंडळाला खासगी बस कंपन्याचा आर्थिक फटका बसू नये याकरीता ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

‘Petrol price at all-time high…time govt removed tax burden on fuel’

With the petrol and diesel prices touching an all-time high, the All India Petrol Dealers’ Association (AIPDA) has renewed its demand to remove the tax burden on fuel prices. In an interview with The Indian Express, AIPDA spokesperson Ali Daruwala said if the state govt removes cess, the fuel prices will come down by at least Rs 6/litre

पालिकेचे 25 कर्मचारी ‘लाच’ प्रकरणात अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कामे करण्यासाठी ‘लाच’ घेण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. आतापर्यंत तब्बल 25 कर्मचारी विविध कारणांसाठी ‘लाच’ घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ताब्यात आले आहेत. कारवाईची संख्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. हे प्रकार ‘शिस्तबद्ध’ आणि ‘पारदर्शक’ कारभार करणार्‍या सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, पालिकेतील इंग्रजी पाट्यांना फासलं काळं

...तर अधिकाऱ्यांना काळं फासू - मनसे

कीर्तन प्रशिक्षण शिबीरात 22 जणांचा सहभाग

चौफेर न्यूज –  ह. भ. प. दीपक शंकर रास्ते यांच्या वतीने आयोजित केलेल्या 24 व्या कीर्तन प्रशिक्षण शिबीरात 22 जणांनी सहभाग घेतला.

रहाटणीतील मायेच्या शाळेला शालेय साहित्याचे वाटप

जुनी सांगवी - रहाटणी येथील नखातेनगर येथे परराज्यातुन पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या शिक्षणापासुन वंचित असलेल्या मजुरांच्या मुलांना येथील जनसेवा फाऊंडेशनचे मनोज वंजारी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'मायेची शाळा' भरवत आहेत. याबाबत सकाळ मधुन बुधवार ता.९ मे च्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सकाळची बातमी वाचुन येथे राहणाऱ्या या मुलांसाठी पिंपरी चिंचवड शहर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व वहिपेन संकलन समितीच्या वतीने वहिपेन व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.