Wednesday 23 May 2018

सीओईपी उभारणार रिसर्च व टेक्‍नॉलॉजी पार्क

शासनाने दिली चिखली येथील 11 हेक्‍टर जागा
पुणे– शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) चिखली (ता. हवेली) येथील 11 हेक्‍टर 30 आर इतकी जागा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जागेवर सीओईपीतर्फे रिसर्च व टेक्‍नॉलॉजी पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

बिया तुमच्या; रोपे आम्ही देऊ

रावेत - आंबे, फणस, जांभळे, करवंद खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया कचऱ्यात टाकू नका. त्या स्वच्छ धुवून ठेवा आणि पावसाळ्यात जाताना- येताना रस्त्यांच्या कडेला, माळरानावर टाका. अथवा आम्हाला द्या. आम्ही त्यांची रोपे तयार करून तुम्हाला देऊ. तसेच त्यांची लागवड करू, असे आवाहन शहरातील पर्यावरणप्रेमी तरुण करत आहेत.

“मेट्रो’मार्गावर पावणे दोनशे वृक्षांना पुनरुज्जीवन!

पिंपरी – सजीवांमध्ये केवळ वृक्ष-वनस्पतीच अशी प्रजाती आहे, की जिचे बीज एकदा जिथे रोवले गेले तिथेच शेवटपर्यंत वाढत राहते. परिस्थिती कशी जरी असली तरी पलायन किंवा स्थलांतर करण्याची मुभा निसर्गाने वृक्ष-वनस्पतींना दिली नाही. कित्येक विकास प्रकल्पांमध्ये आडव्या येणाऱ्या झाडांना विकासासाठी आपला बळी द्यावा लागतो. परंतु, “मेट्रो’ प्रशासनाने वृक्षांची कत्तल न करता त्यांनाही स्थानांतरणाचा अनुभव मिळवून दिला आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने 171 झाडांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आले आहे.

“खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवड – थेरगाव सोशल फाउंडेशन व आंघोळीची गोळी या संस्थेच्या वतीने खिळेमुक्‍त झाडांचे थेरगाव उपक्रम राबवण्यात आला.

पिंपरी वाघेरेतील दोन गृहप्रकल्पांना मंजुरी

पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी वाघेरेतील दोन गृहप्रकल्पांना राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. यामध्ये आरक्षण क्र. 77 मधील 377 सदनिकांचा तर आरक्षण क्र. 79 अंतर्गतत 231 सदनिकांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये

पुणे - वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून आरटीओ टॅक्‍स आणि रजिस्ट्रेशन चार्जेसशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नका. याबाबत ग्राहकांची तक्रार आल्यास संबंधित वितरकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील वितरकांना मंगळवारी बजावले.

महापौरपदावरून संघर्षाची चिन्हे

पिंपरी - महापौर बदलासंदर्भात भाजपमध्ये चर्चा सुरू झाली असून, नवीन महापौर भोसरीचा होणार की चिंचवडचा, यावरून पक्षांतर्गत जोरदार संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. या समवेत उपमहापौरही बदलले जातील. सभागृह नेतेपदीही नवीन नियुक्ती होईल की नाही, याबाबत नगरसेवकांमध्ये चर्चा आहे.

पिंपरीतील अग्निशामक दलाचा गोरखधंदा

दिवाळीत फटाक्यांचे स्टॉल टाकण्यासाठी या विभागाची परवानगी आवश्यक असते

शहरबात पिंपरी : वैद्यकीय सेवेचा बट्टय़ाबोळ

चांगले डॉक्टर रुग्णालयाला मिळत नाहीत, हे चव्हाण रुग्णालयाचे दुखणे आहे.

भोसरीत पाणी कमी पडू देऊ नका

आमदार महेश लांडगे यांच्या सूचना

भोसरी परिसरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणालाही पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करा, अशा कडक सूचना आमदार महेश लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

[Video] पेट्रोल दरवाढीने ग्राहक भडकले

पेट्रोल दरवाढीने उच्चांक गाठल्याने नागरिक भडकले आहेत.

पिंपरी – उद्योगनगरीतील त्रिकूट चित्रपट निर्मिती क्षेत्रात

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जणांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘साई ॲग्रो टेक’ या संस्थेच्या माध्यमातून या तीन जणांनी पहिल्यांदाच या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. शंभू ओव्हाळ, विजय जगताप, आणि अरविंद अडसूळ यांनी चित्रपट निर्मितीची धूरा सांभाळली आहे. महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदेही या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येणार आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तूत ‘नंदू नटवरे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

Girish Bapat: Three sites identified for Pimpri-Chinchwad Commissionerate


Civic body considers Metro corridor extension to Chandni chowk

PUNE: The extension of the metro rail corridor up to Chandni chowk is on the cards.

आधी भूमिपूजन मग सल्लागार महापालिकेचा उलटा चष्मा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमण्याची जणू प्रथा पडली आहे. पण आता त्याचा अतिरेक झाला आहे मोरवाडी येथे दिव्यांगासाठी बांधण्यात येणार्‍या कल्याणकारी केंद्राच्या कामाची अगोदर निविदा काढली. त्यानंतर भूमिपूजन करण्यात आले आणि आता काम कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाचा उरफाटा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात पर्यावरण प्रेमी संघटनांसह सामाजिक संघटनांचाही सहभाग

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा रविवारी (दि. 20) 197 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे पार पडला. यावेळी विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांच्या 200 सदस्यांनी सहभाग घेतला. रविवारी 5 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. यामुळे आजवर 1355 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे.

प्रदूषणापासून पवना वाचवा

पिंपरी - पवना नदीत वाढलेली जलपर्णी, मिसळले जाणारे सांडपाणी, पात्रात टाकण्यात येणारा राडोराडा या विरोधात फुगेवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २२) आंदोलन केले. ‘प्रदूषणापासून पवना वाचवा’ अशी हाक देत नदी घाटावर मानवी साखळी करून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.  

जिल्हा रुग्णालयच ‘आजारी’

पिंपरी - सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. साफसफाईचा अभाव, परिसरातील बंद दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद, कॅंटीन नाही, अपुरे मनुष्यबळ आदी अत्यावश्‍यक बाबींच्या अभावामुळे रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. 

मैदान महापालिकेचे अन्‌ पार्किंग रस्त्यावरच!

पिंपरी – कृष्णानगर येथील महापालिकेच्या गजानन म्हेत्रे उद्यान व मैदानाला पार्किंग समस्येने ग्रासले आहे. पार्किंगची सोय नसल्याने येथे उद्यानात व मैदानावर येणाऱ्यांना वाहने बाहेर रस्त्यावरच लावावी लागत आहेत. तसेच या रस्त्यावर अनेक छोटे-मोठी हातगाडी व किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे मैदानावर येणारे लोक आपली वाहने अस्ताव्यस्त लावत असतात. परिमाणी वाहतूक कोंडी होत आहे.

In Pimpri, where playgrounds are rare, kids risk lives by playing on public roads

Residents and activists alleged that the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has allowed construction activity in all open spaces in suburbs that are well-connected. One such suburb is Kasarwadi.

वाकडमध्ये दहशत करणारा 'गंग्या' तडीपार

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे याला पोलिसांनी दीड वर्षासाठी तडीपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवायामूळे गंग्याची दहशत निर्माण झाली होती. 

दहशत माजवणे पॅशन, फॅशन

  • चाकण परिसरातील धक्कादायक वास्तव : अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक समावेश
चाकण – गेल्या काही महिन्यापासून चाकण व परिसारत सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन भयग्रस्त झाले आहे. तर कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली होत असल्याचे वास्तववादी भयानक चित्र दिवसेंदिवस गडद होत राअहे. तसेच दहशत माजविण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या टोळळ्या कार्यरत असून त्यांना दहशत माजवणे म्हणजे पॅशन आणि फॅशन वाटू लागली आहे.

चिंचवडमध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

चौफेर न्यूज – शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा महापालिकेच्या वतीने सध्या सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिंचवड येथे सुरू असणाऱ्या अशाच चार बांधकामांवर महापालिकेच्या वतीने सोमवारी (दि.२२) कारवाई करण्यात आली. यामुळे छुप्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहेत. 

थेरगावात “थेरगाव सोशल फाऊंडेशन”ची स्थापना

चौफेर न्यूज – थेरगाव परिसरातील सर्व सामाजिक संस्थांचे संघटन करून “थेरगाव सोशल फ़ाउंडेशन” ची स्थापना करण्यात आली आहे. थेरगाव परिसरातील समस्या निर्मूलन व सामाजिक कर्तव्य दक्षतेसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.